चूर्शीची लढत होती पण..एकतर्फी विजय… बाजार समितीत वीरेंद्र जगताप यांची एक हाती सत्ता कायम  18 पैकी 17 उमेदवार विजयी…

चूर्शीची लढत होती पण..एकतर्फी विजय… बाजार समितीत वीरेंद्र जगताप यांची एक हाती सत्ता कायम 
18 पैकी 17 उमेदवार विजयी…

 

MB-NEWS (चांदुर रेल्वे) :-गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली बाजार समिती निवडणुक आज पार पडली असून त्याची मतमोजनीही आजच करण्यात आली त्यात माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यावर विश्वास ठेवत मतदारांनी त्यांना एक हाती सत्ता मिळवून दिली असून एकूण 18 उमेदवांपैकी 17 उमेदवार काँग्रेस प्रणित शेतकरी सहकार पॅनलचे उमेदवार निवडून आले. तर विरिधकांनी एक निसटता विजय मिळविला आहे.

गेल्या महिन्याभरापासून बाजार समिती निवडणुकीने तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते, गेले दीड वर्षांपासून या निवडणुका लांबणीवर पडल्याने प्रशासक बाजार समितीचा कारभार चालवत होते, त्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक सोसायट्या अवसणात निघाल्याने सत्ताधाऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली होती परंतु आज झालेल्या निवडणूक आणि मतमोजणीच्या निकालात 18 पैकी 17 जागी काँग्रेस प्रणित शेतकरी सहकारी पॅनलचे उमेदवार निवडून आले त्यात अडत व व्यापारी मतदारसंघातून सहकार पॅनलचे सुभाष मूलचंद अग्रवाल व श्यामसुंदर माणिक लाल पणपालिया, हमाल व मापारी मतदारसंघातून सुरेश नामदेवराव जाधव हे विजयी झाले, सेवा सहकार इतर मागासवर्गीय मतदार संघात गणेश सिताराम आरेकर, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून सहकार पॅनलचे प्रशांत कोल्हे, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती हरिभाऊ वसंतराव गवई, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून तेजस हरिभाऊ भेंडे, सेवा सहकारी महिला मतदारसंघात पूजा श्रीनिवास उर्फ बंडू देशमुख व वर्षा प्रदीप वाघ सेवा सहकारी सोसायटी विमुक्त जाती भटक्या जमाती वसंत अण्णाजी गाढवे हे निवडून आले. तर सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघातून सहकार पॅनलचे ,अतुल चांडक, रवींद्र अशोकराव देशमुख, मंगेश श्रीधर धावडे, राजेंद्र श्रीराम राजनेकर, रामेश्वर पंढरीनाथ वानखडे, प्रभाकर हरगोविंद वाघ, रावसाहेब हरिनारायण शेळके हे विजयी झाले आहे. तर एका जागेसाठी पुन्हा मतमोजणी सुरू होती. सहकार क्षेत्रातील आपले वर्चस्व प्रा वीरेंद्र जगताप यांनी पुन्हा सिद्ध केले असल्याची चर्चा ऐकायला मिळाली. विजयी उमेदवारांसह सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

विरोधकांचा रडीचा डाव उलटला
सत्तेचा गैरउपयोग करीत भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार क्षेत्रात विजय मिळविण्यासाठी रडीचा डाव खेळला, अनेक मतदार संघातील मतदारांचा मतदानाचा हक्क त्यांनी हिरावला होता, न्यायालयीन प्रक्रियेत आम्हाला गुंतवून ठेवले परंतु मतदारांनी त्यांचा हा डाव उधळून लावत काँग्रेस ला एकहाती सत्ता मिळवून दिली.
– प्रा वीरेंद्र जगताप, माजी आमदार

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे