मणिपूर घटनेच्या आरोपींना फाशी दया- बिरसा क्रांती दल महिला फोरम व महिला संघटना चांदुर रेल्वेची मागणी
MB- NEWS (चांदुर रेल्वे):- दि. २९ मणिपूर येथील महिला अत्याचाराच्या घटनेचा विविध पक्ष-संघटनांकडून निषेध नोंदवला जात आहे. मागील तीन महिन्यापासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार, महिलांवर अत्याचार, सैनिकांवर हल्ले या मानवतेला काळिमा फासणाऱ्या बाबी आहेत. भारतीय संस्कृतीत स्त्रीयांना खूप मोठे स्थान आहे, आज स्त्रीया सुरक्षित नसतील तर येणारा काळ खूप भयावह राहणार आहे. याच घटनेचा निषेध म्हणून बिरसा क्रांती दल महिला फोरम व महिला संगठन चांदुर रेल्वे च्यावतीने या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी महामहिम राष्ट्रपती व देशाचे पंतप्रधानांच्या नावे निवेदन तहसीलदार चांदुर रेल्वे यांच्या मार्फत पाठविण्यात आले.
यावेळी बिरसा क्रांती दल महिला फोरम अमरावतीच्या जिल्हाध्यक्ष प्रा. अनिता एस धुर्वे, तालुकाध्यक्ष आशा मरस्कोले, महिला संगठनेच्या हर्षाली आंबटकर, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. पुर्ती लाकोडे, हर्षा कोहराम, वर्षा मालखेडे, अश्विनी जाधव, लक्ष्मी शूरटकर, कविता आत्राम, जोशना कुळसंगे, सुलोचना राऊत, बिरसा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष गोकुल मडावी तसेच मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

