Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

यावर्षी १० वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन राष्ट्रसंतांच्या गुरुकुंज मोझरीमध्ये…

यावर्षी १० वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन राष्ट्रसंतांच्या गुरुकुंज मोझरीमध्ये…

MB-NEWS सुनिल घोडमारे (तिवसा, प्रतिनिधी):-लेखणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याकरीता शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण व्हावी म्हणून दिनांक, २१ व २२ जानेवारी २०२३, रोजी गुरुकुंज मोझरी सेवाश्रमाच्या पावनभूमीत दोन दिवसीय दहावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे गुरुकुंज मोझरी येथे आयोजण करण्यात आले आहे.
या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक किशोर सानप हे राहणार आहेत. तर शेती उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करून – शेती उद्योगाला नवी दिशा देणारे नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे संस्थापक विलास शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाच्या स्वागतध्यक्षपदी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांची निवड करण्यात आलेली आहे.अतिथी म्हणून विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभने ,अतिथी म्हणून तर विदर्भ व वऱ्हाडी कादंबरीकार तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे उपस्थित राहणार असल्याची माहिती विजय मुटे, राजेंद्र फड, किशोर सानप, यांनी तिवसा येथील शासकीय विश्रामगृहात आज सम्पन्न झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत आहे.
व, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंजात आयोजित करण्यात आलेल्या संमेलनामध्ये शेतकरी कवी संमेलन, शेतकरी गझल, मुशायरा, परिसंवाद, कथाकथन असे विविध अंगी, सत्र असणार आहेत. संमेलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक, राजकीय नेते, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ, अनुभवी वक्ते सहभागी होणार आहेत, या दोन दिवसीय आयोजित केलेल्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य समेलनाप्रसंगी जिल्हा तसेंच महाराष्ट्रlतुन जास्तीत जास्त शेतकरी व साहित्यिकानी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडू करण्यात आले आहे,

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे