Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

ठाकरेंना संपविण्याचा विडा, त्याला आपल्या मुन्नाभाईची साथ, उद्धव यांचा राज यांच्यावर निशाणा

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चा आहेत. भाजप नेतेही राज ठाकरे यांना अधून मधून भेटत आहेत. भाजपला अनुकूल असलेला अजेंडा राज ठाकरे राबवत असल्याचा आरोप मविआ नेते करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगावच्या सभेत राज ठाकरेंवर पुन्हा ‘मुन्नाभाई’ म्हणत निशाणा साधला.

“काहीही करून उद्धव ठाकरेंना संपविण्याचा विडा भाजपाने उचलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे चेलेचपाटे मुंबई जिंकण्यासाठी काहीच दिवसात मैदानात उतरतील आणि त्याला आपल्या मुन्नाभाईची साथ असेल, पण शिवसेनेच्या नादाला लागाल तर कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना म्हणजे रस्त्यावर पडलेली नाही. शिवसेनेच्या वाट्याला यायचा प्रयत्न करु नका. सेना म्हणजे रस्त्यावर पडलेलं झुरळं नाही”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपसह राज ठाकरेंनाही जोरदार प्रत्युत्तर दिलं.

पुढच्या पंधरा दिवसांवर दसरा मेळावा आलेला असताना आज मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी गोरेगावच्या नेस्को मैदानावर शिवसेना गटप्रमुखांचा विराट मेळावा घेतला. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावर असताना केलेल्या कामाचा विशेष उल्लेख करत, मी हिंदू-मुस्लिम, मराठी-अमराठी असा भेदभाव केलेला नसून आज मुस्लिम बांधव आणि अमराठी बांधव देखील शिवसेनेसोबत असल्याचा ठासून सांगितलं. भाजपने कितीही दुहीचा अजेंडा पेरला तरी हिंदुत्व समजणारे लोक आपल्या साथीला असून त्यांच्या पाठिंब्याच्या बळावरच आपण मुंबई महापालिकेवर आपला भगवा पुन्हा डौलाने फडकवू, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांनी बांद्रा कुर्ला संकुल येथे १५ मे रोजी घेतलेल्या सभेत राज ठाकरे यांचा उल्लेख मुन्नाभाई म्हणून केला होता. आपल्या खांद्यावर भगवी शाल घेऊन एक मुन्नाभाई आपल्याला बाळासाहेब समजतो आहे, अशा शब्दात त्यांनी भोंग्यावर आंदोलन करणाऱ्या राज ठाकरेंवर प्रहार केला होता. आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना ‘मुन्नाभाई’ म्हणत त्यांची खिल्ली उडवली तसेच भाजपला साथ देणाऱ्या राज ठाकरेंवर निशाणा साधला.

शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, कोथळा बाहेर काढू

शिवसेना म्हणजे रस्त्यावर पडलेली नाही. शिवसेनेच्या वाट्याला यायचा प्रयत्न करु नका. सेना म्हणजे रस्त्यावर पडलेलं झुरळ नाही. रक्तपात झाला तर आपल्यात आणि गद्दारात होईल. रक्तपात शिवसैनिकांमध्ये होईल, कमळाबाई शाबूत राहील.गद्दार असलेल्यांपेक्षा मुठभर निष्ठावान असलेले बरे. आपल्या आयुष्यातली ही पहिली निवडणूक समजून लढा. विजय आपलाच, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुलं पळवणारी टोळी ऐकली आहे, बाप पळवणारी औलाद पण आलीये!

मुलं पळवणारी टोळी ऐकलेय, बाप पळवणारी औलाद पण आलेय. त्यामुळे मंचावर आल्यावर पहिल्यांदा बाळासाहेबांचा फोटो पाहिला. गद्दारांना सत्तेचं दूध पाजलं पण ते आता तोंडाची गटारं उघडतायेत. मुंबईवर लचके तोडणाऱ्या गिधाडांची औलाद आली आहे. निजामशाह, आदिलशाह त्या कुळातील आताचे शाह, देशाचे गृहमंत्री… मुंबईत येऊन काय म्हणाले- ठाकरेंना जमीन दाखवा… मी शिवसैनिकांना आवाहन करतोय, त्यांना तुम्ही अस्मान दाखवा. ही नुसती गवताची नाही तलवारीची पातीही आहे. मुंबई तुमच्यासाठी स्क्वेअर फुटातील जमीन असेल, आमची ही मातृभूमी आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपच्या मुंबई मिशनचा समाचार घेतला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे