Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजन

पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजन*

MB NEWS ( महाराष्ट्रातील बातमीपत्र) अमरावती:- गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला असून, पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची आज संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत स्थापना करण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष आ. प्रविण पोटे पाटील यांनी श्री गणरायाचे मनोभावे पूजन करून दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांनी संस्थेतील विद्यार्थी, प्राध्यापक व सर्व कर्मचाऱ्यांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी श्री गणरायाकडे प्रार्थना केली.

गणरायाच्या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. ढोल-ताशांचा गजर, गणरायाचा जयघोष आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला.या मंगलमय प्रसंगी प्राचार्य, प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत भक्तिभावाने गणरायाचे स्वागत करण्यात आले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे