Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

रिद्धपूरच्या मराठी भाषा विद्यापीठासह महानुभाव तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची भेट! अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सदिच्छा भेट; विविध मागण्यांचे निवेदन सादर

रिद्धपूरच्या मराठी भाषा विद्यापीठासह महानुभाव तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची भेट!
अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सदिच्छा भेट; विविध मागण्यांचे निवेदन सादर

MB NEWS (मुंबई ब्युरो): मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर तसेच महाराष्ट्रातील महानुभाव पंथाशी संबंधित महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाला गती मिळावी, यासाठी अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. याच अनुषंगाने ९ सप्टेंबर रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष गुरूवर्य श्री. कारंजेकर बाबाजी यांच्या उपस्थितीत झालेल्या या भेटीत रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाच्या विकासासह महाराष्ट्रातील महानुभाव पंथातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासंदर्भातील मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या. यावेळी संबंधित मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले.
रिद्धपूरला मराठी भाषा, साहित्य आणि महानुभाव परंपरेच्या दृष्टीने विशेष महत्त्व असून, या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा विद्यापीठामुळे या ऐतिहासिक भूमीला नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच महानुभाव पंथाशी निगडित विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासामुळे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनालाही चालना मिळू शकते.
यावेळी मांडण्यात आलेल्या विविध विषयांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकपणे दखल घेत संबंधित प्रश्न समजून घेत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे महानुभाव पंथाच्या अनुयायांमध्ये तसेच रिद्धपूरच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या नागरिकांमध्ये आशावादी वातावरण निर्माण झाले आहे.
या महत्त्वपूर्ण भेटीप्रसंगी प.से. श्री. प्रकाश नन्नावरे आणि प.से. चेतन नलावडे यांची उपस्थिती होती. रिद्धपूरसह महानुभाव पंथाच्या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांच्या विकासासाठी झालेली ही भेट आगामी काळात महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे