Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची नोकरी जाणार; अनुकंपा वगळता इतरांना आता संधी नाही..!

टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची नोकरी जाणार; अनुकंपा वगळता इतरांना आता संधी नाही..!

शालेय शिक्षण विभागाच्या १३ फेब्रुवारी आणि  २०१३ चा निर्णयानुसार आदेशानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्णचे बंधन घालण्यात आले होते, तर काहींना मार्च २०१९ पर्यंत तीन किंवा पाच संधी देण्यात आल्या होत्या मात्र, मुदत देऊनही अनेकजण टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत. अशा शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे.
शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी संबंधित उमेदवार टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण होण्याचे बंधन २०१३ पासून लागू करण्यात आले आहे. अनेकांनी नियुक्तीनंतर टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी तीन ते पाच वर्षांची मुदत घेतली. त्यानुसार २०१९ पर्यंत ही मुदत असतानाही अनेकांना त्या मुदतीत टीईटी उत्तीर्ण होता आलेले नाही. मुदतवाढ घेऊनही टीईटी उत्तीर्ण न होता शासनाची पगार घेणाऱ्या शिक्षकांचा शोध घेतला जात असून जे शिक्षक आढळतील त्यांची सेवासमाप्ती केली जाणार आहे.
तत्पूर्वी, अशा शिक्षकांची नावे शिक्षण उपसंचालकांना पाठविली जाणार आहे. त्याठिकाणी सुनावणी होईल आणि सुनावणीअंती उपसंचालक शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या शिक्षकांवर सेवासमाप्तीची कारवाई करतील.

शाळेने वस्तुनिष्ठ माहिती द्यावी
शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांपैकी कोण टीईटी उत्तीर्ण नाहीत, याची माहिती मागविण्यात आली आहे. कोणत्याही शाळेने माहिती न लपविता वस्तुनिष्ठ माहिती देणे आवश्यक आहे.

‘टीईटी’ उत्तीर्णसाठी मुदतवाढ बंद
शासनाच्या २०२० मधील निर्णयानुसार अनुकंपा वगळता अन्य प्रवर्गातील शिक्षकांना (जे टीईटी उत्तीर्ण नाहीत असे) टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देणे बंद करण्यात आले आहे. अनुकंपा तत्त्वावरील शिक्षकांनाच तीन वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्यात येते. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण नसतानाही शासनाचा पगार घेणाऱ्या शिक्षकांच्या अडचणी वाढणार आहेत.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे