Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अमरावती येथे मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन… आमदार ॲड.येशोमतीताई ठाकुर यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.

अमरावती येथे मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन… आमदार ॲड.येशोमतीताई ठाकुर यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.

MB-NEWS(अमरावती ) नंदकिशोर मते :-दि. १७ एप्रिल २०२३ :- मोदी सरकारच्या हुकूमशाहीच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आज १७ एप्रिल रोजी इर्विन चौक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकार विरोधात टिकास्त्र डागले. त्या म्हणाल्या की, हे सरकार पवित्र संविधानाची तोडफोड करुन अवमान करीत आहे. पुलवामा दहशतवाद्यांनी घडून आणलेल्या स्फोटात अनेक जवान शहिद झाले होते. परंतु जवानांना जाण्यासाठी हेलीक्रॉप्टर देण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र ती नाकारण्यात आली. याचा गौप्य स्फोट जम्मु कश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीच नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत केला. सत्यपाल मलिक हे मोदी सरकारचे निकटवर्तीय होते हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे हा संपूर्ण घटनाक्रम राजकीय लाभ घेण्यासाठी घडवून आणण्यात आला होता हा त्याचा सज्जड पुरावा आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, पुलवामा स्फोट प्रकरण २०१९ च्या निवडणूकीपूर्वी घडविण्यात आले, याचाच अर्थ हा राजकीय स्टंट असून केवळ राजकीय लाभ मिळावा यासाठीच हा प्रेतावरच्या टाळूचे लोणी खाण्याचा मोदी सरकारचा स्पष्ट उद्देश आहे. असे सांगून त्या म्हणाल्या की, सुरक्षा जवानांचे रक्त सांडून त्याचा राजकीय लाभ हे मोदी सरकार घेत आहे. याचा आम्ही जाहिर निषेध करतो, अस त्या यावेळी म्हणाल्या.

आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमेटिचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे