Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

पोहरा येथे झालेल्या अतिवृष्टीच्या मदतीचे घोडे अडले कुठे ?वंचित बहुजन आघाडीचे लक्षवेधी आंदोलन

पोहरा येथे झालेल्या अतिवृष्टीच्या मदतीचे घोडे अडले कुठे ?वंचित बहुजन आघाडीचे लक्षवेधी आंदोलन

जिल्हाध्यक्ष प्रा.शैलेश गवई यांचे नेतृत्व ; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

पावसाळा सुरू होण्यापूर्वी तात्काळ मदत मिळावी

MB-NEWS रवि कलाने (प्रतिनिधि)अमरावती :- तालुक्यातील अतिवृष्टीबाधीत पोहरावासीयांना गेल्या एक महिन्यापासून कुठल्याही प्रकारची मदत शासनाकडून मिळाली नाही केवळ आश्वासनांचा व घोषणांचा पाऊस पाडून गेलेले शासन खऱ्या पावसाच्या सुरू होण्यापूर्वी मदत देणार का ? असा प्रश्न उपस्थित करीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.शैलेश गवई यांनी आपल्या आंदोलनातून शासनाला केला आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पोहरा गावातील 19 घरांचे पूर्णतः व 383 घरांचे अंशतः नुकसान झाले होते,गावातील बाधित राहिवाश्यांनी आपला निवारा तात्पुरत्या स्वरूपात इतरत्र हलवला परंतु येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात होईल त्यापूर्वी यासर्वांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी गावकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला निवेदन दिले आहे

गावकऱ्यांना शासनाकडून मदत तात्काळ द्यावी तसेच अतिवृष्टी बाधीत गावकरी व वंचित च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व स्थानिक तहसिल कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना दिले.

१५ दिवसापर्यंत शासनाकडुन कोणतीही प्रशासकिय कार्यवाही न झाल्यास वंचित बहुजन आघाडी च्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण केल्या जाईल असा इशारा सुध्दा निवेदनातुन जिल्हाध्यक्ष प्रा.शैलेश गवई यांनी दिला आहे. या आंदोलनात वंचित च्या कार्यकर्त्यांसह शेकडो गावकऱ्यांचीही उपस्थिती होती.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे