महाराष्ट्र जनक्रांती सेनेतर्फे मेळघाट हक्क परिषद कार्यक्रमाचे मेहरीआम गावात आयोजन,हजारो कार्यकर्ते उपस्थित.

महाराष्ट्र जनक्रांती सेनेतर्फे मेळघाट हक्क परिषद कार्यक्रमाचे मेहरीआम गावात आयोजन,हजारो कार्यकर्ते उपस्थित.

MB-NEWS(.अक्षय अथोटे )चिखलदरा प्रतिनिधी:-
महाराष्ट्र जनक्रांती सेनेतर्फे चिखलदरा तालुक्यातील मेहरीआम गावात मिशन युवा नेतृत्व २०२४ जन संवाद व मेळघाट हक्क परिषद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष सखाराम धिकार व प्रमुख मार्गदर्शक म्हणून मन्ना भाऊ दारसिम्बे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र जनक्रांती सेना हे उपस्थित होते.या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी व आदीवाशी समाजाची संस्कृती,रीती रिवाज ,जुनी परंपरा टिकविण्यासाठी मध्यप्रदेश राज्यात आपल्या स्वतःहा चा मेहनतीवर आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण करणारे कोरकू समाज डान्स कलाकार मा.सतीश दादा ठाकरे व टीम उपस्थित होती.विशेष मार्गदर्शन भाषणात उपस्थित कार्यकर्ते यांना मन्ना भाऊ दारसिम्बे यांनी सांगितले की, भारत देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष झाले आहे.परंतु आपल्या मेळघाटाची परिस्थिती दयनीय आहे.मेळघाटातील जनतेने आपले अमूल्य मत देऊन मेळघाटातून अनेक लोकप्रतिनिधी यांना निवडून दिले आहे. परंतु मेळघाटात वास्तव करणाऱ्या समाज बांधव यांचा नशिबी निराशा आल्या आहेत. मेळघाटात आजही अशी गावे आहेत की,त्या गावात साधी मूलभूत सुविधा सुद्धा पोहचल्या नाही.रस्ते,वीज,दळणवळणाचा सुविधा,पाणी,अशी परिस्थिती आजही देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षानंतर असेल तर आपल्याला आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. आपण कोठे चुकलो?कि,आपण ज्या लोकप्रतिनिधी यांना आपले अमूल्य मत दिले होते त्यानी आपल्या सोबत विश्वातघात तर केला नाही ना? आपण मत देतांना काही गोष्टीचे अमिष तर पडलो नाही ना?असे अनेक प्रश्नन आहे .आपण सर्व मेळघाटातील जनतेचे आत्माचिंतन करावे.जेणेकरून समोर चालून आपल्या वर अशी परिस्थिती येऊ नये. मेळघाटातील जनता हि भोळी आहे.कोणीही थोडे आमिष दिले तर आपण बळी पडतो. आपल्या मेळघाटातील जनता दर्जेदार शिक्षणापासून वंचित आहेत. मेळघाटातील युवा वर्गाने व्यसना पासून दूर होऊन शिक्षणाचा प्रहावात यावे.शिक्षणा मुळे चांगल्या गोष्टी आत्मसात होते.आपल्या समाजाची प्रगती झपाटयाने व्हावी यासाठी शिक्षण घेणे खूप गरजेचे आहे. शिक्षण घेत असतांना किंवा कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश करीत असतांना काही अडचण येत असल्यास तात्काळ संपर्क करावे.आपणास योग्य ती मदत आम्ही करणार.महाराष्ट्र जनक्रांती सेना हि संघटना आस्वाशन देणारी संघटना नसून शोषित,वंचित,लोकांना सोबत घेऊन काम करणारी संघटना आहे.चेहरा क्या देकते हो,दिल मे उतरकर देखो ना असे एक गाणे जुन्या काळी होते.तसेच आमचा संघटना चे सुद्धा काम आहे.लोक आम्हाला त्याचा स्वार्थ साधण्यासाठी बदलाम करीत आहे.परंतु मेळघाटातील जनतेला माझे असे अहवान आहे की,आपण असे अफवा वर विश्वास ठेवू नये.आमचा सोबत जुडा काम करा.आपल्याला सर्व समजणार काय सत्य आहे.विरोध करण्यापेक्षा सोबत येऊन काम करा व मेळघाटातील जनतेचा पदरी आलेल्या दुःखांणा आता तरी पूर्ण विराम द्या.महाराष्ट्र जनक्रांती संघटना वैचारिक आहे.सर्व जाती धर्मा साठी काम करणारी संघटना आहे.असे मत मन्ना भाऊ दारसिम्बे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले मान्यवर अनिल गायकवाड शहर अध्यक्ष धारणी,शिवाबाबा जामुनकर,संजू साकोम,अशोक कासदेकर,प्रशांत पंडोले,विनोद धिकार,सतीश भिलावेकर,शुभम भाऊ,अजय अखंडे,रामजी धिकार,सुरेंद्र मावस्कर,राजेंद्र कासदेकर,शंकर धिकार,श्रीराम धिकार,छगन जामुनकर,सखाराम धिकार व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे