महावितरणच्या विरोधात धामणगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महावितरण कार्यालयावर ठिया आंदोलन…
MB NEWS :-धामणगाव रेल्वे(प्रतिनिधी)महावितरण चा भोंगळा कारभार च्या विरोधामध्ये तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले पंधरा ते वीस दिवसापासून पावसामध्ये खंड पडल्यामुळे पिक मरण अवस्थेत असताना महावितरण ने इमर्जन्सी लोड शेडिंग लावून शेतकऱ्यांचे मरण निश्चित केले आहे अवेळी विद्युत प्रवाह खंडित करणे वेळ वाढून नदेणे, नादुरुस्ती डीपी, महावितरण ने विद्युत प्रवाह सोडण्याचा जो शेड्युल ठरवून दिलेला आहे तो शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला आहे रात्री ११.०० वाजता ते सकाळी ७.०० आठवड्यातून तीन दिवस वाजेपर्यंत तसेच आठवड्यातून चार दिवस सकाळी ७.००ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत त्यातही शेतकऱ्यांना खंडित पुरवठा होतो त्यामुळे एक ते दोन तास लाईन बंद असते अशा अवस्थेमध्ये पिके वाचवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आलेला आहे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांचा आवाज बनवून पाच तास ठिया आंदोलन करण्यात आले महावितरण चे अभियंता आलेगावकर साहेब तसेच उपअभियंता शर्मा मॅडम यांच्याकडून आश्वासित करण्यात आले की पुढील पाऊस येईपर्यंत कमीत कमी दररोज दिवसा आठ तास बीज देण्यासंदर्भात वरिष्ठांना कळविण्यात येईल व तातळी निर्णय घेण्यात येईल नादुरुस्त डीपी लाईनमन च्या बाबतीतल्या तक्रारी सुद्धा देण्यात आल्या याचा त्वरित निपटारा करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले या सर्व बाबींचा विचार करून निर्णय न घेतल्यास पुढील सात दिवसांमध्ये अमरावती येथील अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलनाचा इशारा तालुका काँग्रेस कमिटी युवक काँग्रेस कमिटीच्या शहर काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस कमिटी वतीने देण्यात आला.

यावेळेस माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप यांनी असे म्हटले की ऊर्जा मंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते की आमचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करू व शेतकऱ्यांना दिवसाला आठ तास वीज उपलब्ध करून देऊ परंतु हेच ऊर्जामंत्री असताना लोड शेडिंग करून शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आहे
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पंकज वानखडे, जिल्हा परिषदचे माजी सभापती सुरेश निमकर ,शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीप मुंदडा ,जिल्हा परिषद ची माजी सदस्य मोहनजी घुसडीकर, नितीन कनोजिया, महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनिताताई मेश्राम, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कविता गावंडे ,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मंगेश बोबडे, पंचायत समिती सभापती कल्पना उईके, धामणगाव शहर कार्याध्यक्ष चंदू डहाणे, शुभम भोंगे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष शिंदे, संगीता गाडे, मुकेश राठी, सचिदानंद काळे ,अविनाश इंगळे, अविन टेकाळे ,सुरेंद्र जयस्वाल, मनोज वेरूळकर, सुनील भोगे, मुकिंद माहोरे, विपिन ठाकरे, हेमंत कडू ,संजय गाडे, अमोल कडू, विठ्ठलराव सपाटे, गजानन पाटील, प्रफुल कडू, रमाकांत इंगोले, संकेत उभाड ,अजय तूपसुंदरे, विवेक वराडे ,अमोल म्हात्रे, कैलास वानखडे, मंगेश ढाले, अभिषेक खंडारे, शुभम चौबे, राजेश पुरोहित, बबलू भेंडे, रुपेश गुल्हाने, विलास भिल, मेघा सबाने ,सविता इंगळे, मीनाक्षी ठाकरे, पुरुषोत्तम उडाखे, प्रशांत सबाने, दिवाकर ठाकरे, रोफभाई ,दिनकरराव जगताप, निवृत्ती वैद्य, यशवंत बोरकर ,भाऊरावजी बमनोटे, भाऊरावजी अडकणे, असंख्य शेतकरी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


