तिवसा तालुका मध्ये लोकप्रतिनिधी यांचे शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष,सामाजिक कार्यकर्ते दिनेश वानखडे यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नांना फोडली वाचा….
MB NEWS (महाराष्ट्रातील बातमी) सुनिल घोरमाडे प्रतिनिधी, तिवसा :-सद्यस्थितीत दिवसा तालुक्यामध्ये महत्त्वाचे लोकप्रतिनिधी असतानी सुद्धा शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे तेव्हा सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दिनेश वानखडे यांनी तालुक्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडत सन 21 22 मध्ये नाफेड अंतर्गत होणारी चण्याची खरेदी बंद झाली होती तेव्हा तालुक्यातील शेकडो शेतकरी घेऊन आंदोलन केले याची दखल घेऊन नाफेड अंतर्गत येण्याची खरेदी सुरू करून रजिस्टर शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला तसेच सण 22 -23 मध्ये तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली सततचा पाऊस पडला यामध्ये संत्रात सहित सर्व पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याचा पाठपुरावा तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी करावेला हवा होता परंतु ही जबाबदारी दिनेश वानखडे समवेत त्यांच्या मित्रपरिवार आणि उचलून वरखेड मंडळातील 22 गावांना न्याय मिळवून दिला तसेच तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सततच्या पावसाचे नुकसान भरपाई चे पैसे सुद्धा मिळून दिले त्याचप्रमाणे तालुक्यातील गरजू लोकांना मदत करणे सद्यस्थितीमध्ये तालुक्यात दिनेश वानखडे हे शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणारे एकमेव व्यक्ती असल्याच्या चर्चा सर्वसामान्य माणसांमध्ये रुजले आहे.
तेव्हा सद्यस्थितीमध्ये काही कुरा परिसरातील शेतकऱ्यांचे सततच्या पावसाने नुकसान झालेले संत्राचे पैसे तसेच पिक विमा कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश न झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून अनेकदा शासन दरबारी पत्रव्यवहार केला आंदोलने सुद्धा केली सद्यस्थितीमध् तालुक्यातील शेतकऱ्यांचा एकमेव चेहरा म्हणून दिनेश वानखडे यांच्याकडे पाल जात त्यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की समाजामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये काही उणीव दिसल्यास माणूस म्हणून आपलं जे कर्तव्य ठरतं ते प्रत्येकाने पार पाडायला हवा तोच भाग मी करत आहे.. अश्यातच येथील लोकप्रतिनिधी चे मात्र शेतकऱ्यांनचे प्रश्न सोडविण्यासाठी मात्र वेळ दिसत नाही.

