.”तंत्रज्ञानाचा वापर करुण अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कपाशी पिकाबद्धल मार्गदर्शन”
MB NEWS(महाराष्ट्रातील बातमीपत्र):-रिलायन्स फाऊंडेशन तर्फे डिजिटल फार्म स्कुल च्या अंतर्गत व्हाट्स अँप च्या माध्यमातून *कापूस व तूर पिकांतील कीड व रोग व्यवस्थापन* विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली, त्यात सध्या खरीप हंगामात, त्यातच अमरावती जिल्यातील प्रमुख पिक म्हणून कापूस व तूर पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते ,व शेतकऱ्यांना कापूस व तूर पिकात कीड व रोग या संबंधी बरेच प्रश्न होते. त्यामुळे या प्रश्नाचे निराकरण करण्याचा उद्देशाने. रिलायंस फॉउंडेशन माहिती सेवा यांच्या मार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमामध्ये डॉ राजेंद्र जाणे, कृषी तज्ञ यांनी शेतकऱ्यांना त्याच्या समस्यांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून जवळ जवळ 80 शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. कापूस व तूर पिकातील कीड व रोग तसेच खत व्यवस्थापन या विषयी आपले प्रश्न विचारले. व्हाट्सअप्प च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन मनोज काळे, रिलायंस फॉउंडेशन व कार्यक्रम सहाय्यक सुमित मातीकाळे यांनी केले.
या वेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणून डॉ राजेंद्र जाणे, कृषी तज्ज्ञ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कापूस व तूर पिकावरील खत व्यवस्थापन, तसेच एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करून उत्पादन जास्त कसे घेता येईल या बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी 80 शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी मिळालेल्या माहिती चा आम्हाला निश्चित लाभ होईल असे सांगितले व शेतकऱ्यांनी व तज्ञांनी रिलायन्स फाउंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक केले.

