विदर्भ राज्य आंदोलन समिती चांदुर रेल्वेच्या जि. अमरावती वतीने मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मा. गृहमंत्री अमितजी शहा यांना मा.SDO.मार्फत निवेदन देण्यात आले.

विदर्भ राज्य आंदोलन समिती चांदुर रेल्वेच्या जि. अमरावती वतीने मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मा. गृहमंत्री अमितजी शहा यांना मा.SDO.मार्फत निवेदन देण्यात आले.

MB-NEWS (अमरावती)चांदुर रेल्वे :-विदर्भ जनतेची विदर्भ राज्याचे मागणी फार जुनी 117 वर्षापासून आहे. भारतीय जनता पक्षाने 1997 भुवनेश्वरच्या अधिवेशनामध्ये वेगळ्या विदर्भाचा ठराव पास केला. सत्तेत येताच वेगळा विदर्भ देण्याचे मान्य केले. आता आपल्या नेतृत्वात भाजपाचे सरकार केंद्रात पूर्णपणे बहुमतात आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात वेगळ्या विदर्भाची मागणी सतत होत आहे. संसदेवर हल्लाबोल आंदोलन जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी 3 जानेवारी 22 ला घेण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पा नुसार महसुली उत्पन्न ४लाख ३ हजार करोड असून, वर्षभराचा खर्च ४ लाख 27 हजार करोड आहे. त्यानुसार तूट 24 हजार 353 करोड आहे .महाराष्ट्र सरकार कर्जबाजारी आहे .६ लाख ६० हजार करोड कर्ज महाराष्ट्रावर आहे आणि आता हे राज्य शिलकी राज्य होऊ शकत नाही. आणि विदर्भ यांच्यासोबत १००वर्ष राहिला तरी शिलकी व सक्षम राज्य होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या विदर्भ राज्य शिलकी व सक्षम राज्य होईल.

75 हजार कोटीचा बॅकलॉग ,कुपोषण व शेतकरी आत्महत्या संपुष्टात येईल. नक्षलवाद व प्रदूषणा सारखे प्रश्न निकाली लागले. तसेच आमदार खासदार सुद्धा वाढतील. आम्ही आशा करतो की आपले सरकार विदर्भ विकासाच्या दृष्टीनेआमच्या मागण्यावर विचार करून पूर्ण करतील असे निवेदनात म्हटले आहे. निवजन देताना अशोकराव हांडे ,बाबाराव जाधव ,नंदकिशोर देशमुख ,दीपक शंभरकर ,अरुण पाटील ,मनोहर बठे , ऍड.मनोहर देशमुख आदी.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे