Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

चांदुर रेल्वे येथील पाटबंधारे विभाग,भाग 1 परिसरातील शेतकरी वर्गाचा विचार केव्हा करणार? रब्बी हंगाम तोंडावर; पाटचाऱ्या बुजलेल्याच पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष…

चांदुर रेल्वे येथील पाटबंधारे विभाग,भाग 1 परिसरातील शेतकरी वर्गाचा विचार केव्हा करणार? रब्बी हंगाम तोंडावर; पाटचाऱ्या बुजलेल्याच पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष…

MB-NEWS(चांदुर रेल्वे) :- खरीप हंगाम संपून रब्बी हंगामाला सुरवात झाली असतांना शेतकऱ्यांनी गहू चना साठी शेतीची मशागत करून पेरणीची तयारी पूर्ण केली आहे, तर दुसरीकडे शेतीसाठी पाणी पुरवणारे पाटबंधारे विभागाच्या पटचाऱ्या अजूनही बुजलेल्याच असून संबंधित अधिकारी दरवर्षी प्रमाणे लेटलतीफ धोरण स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे.

खरीप हंगाम अतिवृष्टी मुळे हातचे गेले, सोयाबीन चा अत्यल्प उतारा व कमी झालेल्या भावामुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे, परंतु सर्व नुकसान बाजूला सारत पुन्हा रब्बी च्या हंगामात व्यस्त झाला आहे. चांदुर भाग एक च्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपले शेत गव्हासाठी तयार केले आहे, रब्बी पिकांचा हंगाम 15 नोव्हेंबर पासून सुरू होतो, शेतीतज्ञाच्या सल्ल्यानुसार 15 नोव्हेंबर पूर्वीच गव्हाची लागवड होणे गरजेचे असते परंतु दरवर्षी काहीतरी कारण देत स्थानिक पाटबंधारे विभाग पाणी सोडण्यास दिरंगाई करतांना दिसून येते, मागील वर्षी पाटचारे सफाई न करताच पाणी सोडल्याने मधातच पाणी बंद करण्याची नामुष्की विभागावर आली होती, यावर्षी पाणी साठा भक्कम असतांना पाटचाऱ्या सफाई कडे दुर्लक्ष करीत पाणी पुरवठा उशिर होत असल्याने शेतकरी वर्ग अस्वस्थ होत आहे, कॅनाल मधील पटचाऱ्या झुडपांनी इतक्या बुजल्या आहे की त्या दिसतही नाही, त्या त्वरित साफ करून 15 नोव्हेंबर पर्यंत विभागाने पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे