श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्त विद्यापीठाच्या ‘ज्ञानगंगा’चे प्रकाशन‘ज्ञानगंगा’ हा अत्यंत अभिनंदनीय उपक्रम – डॉ.एफ.सी.रघुवंशी
MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र)अमरावती :- शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांनी सर्वप्रथम लोक विद्यापीठाची कल्पना मांडली होती.शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हे त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न महाराष्ट्र शासनाने मुक्त विद्यापीठ काढून पूर्ण केले.श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय हे मुक्त विद्यापीठाचे या विभागातील हे पहिले अभ्यासकेंद्र आहे आणि मुक्त विद्यापीठाचा पत्रकारिता अभ्यासक्रम सुरु करणारे देखील हे पहिले महाविद्यालय आहे.या विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रकाशित केलेले ‘ज्ञानगंगा’ हे प्रायोगिक वृत्तपत्र टीमवर्कचा उत्कृष्ट नमुना असून हा अत्यंत अभिनंदनीय उपक्रम आहे, या शब्दात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अमरावती विभागाचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. एफ. सी .रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या ‘ज्ञानगंगा’ या वृत्तपत्राच्या प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे यांच्या अध्यक्षतेत आयोजित या कार्यक्रमाला लोकमतचे अमरावती संपादकीय प्रमुख गजानन चोपडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी प्रेमदास वाडकर, केंद्र संयोजक व इतिहास विभागप्रमुख डॉ.नितीन चांगोले, पत्रकारिता अभ्यासक्रमाचे संयोजक व जनसंवाद विभागप्रमुख डॉ.कुमार बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते.
पत्रकारितेच्या क्षेत्रात खूप स्पर्धा वाढली असून त्यात आता नवीन आर्टिफिशल इंटलीजन्सची भर पडली आहे त्यामुळे बातम्या शोधण्यापेक्षा तथ्य शोधणे महत्त्वाचे झाले आहे कारण फेक न्यूजचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.पत्रकारितेचे काम सोपे राहिले नाही. ज्ञानगंगा हे प्रायोगिक वृत्तपत्र काढून विद्यार्थ्यांनी घेतलेला प्राथमिक अनुभव कौतुकास्पद आहे,असे लोकमतचे अमरावती संपादकीय प्रमुख गजानन चोपडे म्हणाले. आपल्या पत्रकारितेची सुरुवात ज्ञानगंगा पासून झाली.आपण या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असताना सर्वप्रथम ज्ञानगंगासाठी अग्रलेख लिहिला होता.आपले खंडित झालेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी मुक्त विद्यापीठाने व या महाविद्यालयाने दिली त्याबद्धल मी महाविद्यालयाचा कायम ऋणी राहील,या शब्दात प्रेमदास वाडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आपल्या परिश्रमाचे फळ किती आनंदी असते याचा अनुभव ज्ञानगंगा च्या रूपाने विद्यार्थ्यांनी घेतला असून हा एक वेगळा व अप्रतिम आनंद असतो,हे ज्ञानगंगाच्या सर्व चमूच्या चेहऱ्यावर व्यक्त होत असलेल्या आनंदातून दिसून येत आहे, स्वनिर्मितीचा वेगळाच आनंद असतो,असे प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले. डॉ.नितीन चांगोले यांनीही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ज्ञानगंगा २४ चे मुख्य संपादक प्रफुल्ल कुकडे आणि मुख्य व्यवस्थापक विजय चौधरी यांनी आपल्या भाषणातून ज्ञानगंगाच्या निर्मितीची माहिती दिली. या कार्यक्रमात क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटनेच्या वतीने प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे आणि विभागप्रमुख डॉ.कुमार बोबडे यांच्या शाल, पुस्तके व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकारिता अभ्यासक्रमाचे संयोजक व जनसंवाद विभागप्रमुख डॉ. कुमार बोबडे यांनी केले. पत्रकारितेचे विद्यार्थी राजेश तायडे, संजय गुल्हाने, मंगला इंगळे (सरदार), प्रशांत दरवळकर, अवधूत शेन्द्रे, क्रिष्णा बोडणे, जान्हवी कुऱ्हेकर, राजू डांगे, अक्षय भोन्गारे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन सौ.वैशाली परतेकी यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगला इंगळे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ.सुभाष गावंडे, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्ष हर्षा सगणे, विजया निस्ताने, संजय चोपडे, श्रावणी मसराम,प्रा. रुपेश फसाटे, प्रा.मनीषा देशमुख, प्रा. मनीष भंकाळे, डॉ.नकुल धरमकर, प्रा. सर्वेश मराठे, डॉ.गाड्बेल, विवेक जाधव, राधेश्याम पिंजरकर, पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी रेणुका पटेल, शेख तौसीफ, तेजस शिंदे, तथा प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

