अभियान,उत्सव अन फोटो अपलोड करण्यात गुंतले शिक्षक,मुलांना शिकवणार कधी?
MB NEWS (सुनिल घोरमाडे)तिवसा :- महाराष्ट्र सरकारने कोणतेही अभियान सुरु केले की त्याची पहिली जबाबदारी ही शिक्षकावरच येते असी परिस्थिती आज शाळा मध्ये दोन अभियान एक उत्सव सुरु आहे.ऑगष्ट महिना अखेर शिकवीन्या पेक्षा यातील उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्यात शिक्षकाचा अधिक वेळ खर्च पडत आहे.आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहिते पर्यंत हे असे चालणार चित्र दिसत असल्याने विध्यार्थ्यांना शिकवायचे कधी?असा प्रश्न शिक्षक आणि पालकांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या सगळीकडे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना चा दुसरा टप्पा 29 जुलै पासून सुरु होऊन तो 4 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे तथा 5 सप्टेंबर पासून स्पर्धेसाठी मुलांकणा होणार असून यासाठी तालुका,जिल्हा आणि राज्य पातळीवर बक्षीस ठेवण्यात आली आहे.यामध्ये सर्व माध्यमाना व व्यवस्थापकचा शाळांना सहभागी करून घेण्यासाठी प्रशासन धावपळ करत आहे अशातच नेहमी उपक्रमापेक्षा काही वेगळे उपक्रम राबवायचे शिक्षकांच्या मनात येत असल्याने शिक्षकांचा याच कामात गुंतले आहे.यावेळी एक ऑगस्ट ते ऐकतीस ऑगस्ट या कालावधी मध्ये विध्यार्थी गुणवंत्ता विकास महा अभियान राबवण्यास सुरवात झाली आहे यामध्ये पहिल्या विस दिवसात अधिकाऱ्याची शाळेना भेटी घ्यायच्या आहेत त्यानंतर दहा दिवस या शाळेतील तृटी दूर करून सुधारणा करून घ्यायच्या आहेत त्यानंतर पाच दिवसात या सुधारणा झालेल्या त्रुटीतुन जाण्याची खात्री करून घ्यायची आहे आहे सध्या विधानसभेची पडघम सुरु झाले आहेत त्यामुळे सप्टेंबर ला विधानसभा निवडणूक ची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तीविल्या जात आहे.त्यामुळे यापूर्वी सर्व उपक्रम संपविण्याची घाई सुरु आहे त्यामुळे विध्यार्थी शाळेत विध्यार्थी शाळेत दाखल झाल्याने त्याना शिकविण्याचा वेळेतच विविध अभियान उत्सव करणे व त्याचे ऑनलाईन फोटो अपलोड करण्यात शिक्षकांचा शिकविण्यासाठी दिलेला वेळ जात आहे.त्यामुळे यातून वेळ मिळाल्यानंतर शिक्षक विध्यार्थ्यांना शिकवणार कधी?यामुळे सर्व उत्सव अभियान मधून विध्यार्थी यांना कितपत फायदा होईल हे माहित नाही मात्र शिक्षण नाही मिळाल्यास नुकसान मात्र नक्कीच होईल त्यामुळे अशा कार्यक्रमावर सरकारने यादी गाळावी नाहीतर विध्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण?असा प्रश्न पालक वर्गातून विचारला जात आहे.

