Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

नवी मुंबईमध्ये कॅबिनेट, वन मंत्री गणेश नाईक साहेबांचे जल्लोषात स्वागत.

नवी मुंबईमध्ये कॅबिनेट, वन मंत्री गणेश नाईक साहेबांचे जल्लोषात स्वागत.


MB NEWS (नवी मुबंई) संजय पाटील, ब्युरोचिफ :-ऐरोली मतदारसंघाचे आमदार. गणेश नाईक साहेब यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात (कॅबिनेट) वनमंत्री खाते मिळाले. त्यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपताच गणेश नाईक साहेबांचे नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच आगमन झाले .यावेळी संपूर्ण नवी मुंबई मधील सर्वपक्षीय विविध सामाजिक संघटना, एस बी ग्रुप स्थानिक कार्यकर्ते, अधिकारी ,लोकांच्याकडुन जल्लोषात स्वागत करण्यात आले .

नवी मुंबई येथील व्हाईट हाऊस मध्ये आगमन होताच लाखोच्या संख्येने नागरिक आधीपासूनच साहेबांच्या आगमनाची वाट पाहत उभे होते प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, त्याचबरोबर भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने याआधी आले होते नाईक साहेबांच्या आगमनाची स्वागताची भव्य अशी तयारी आधीपासूनच केली होती. नाईक साहेब नवी मुंबईत येताच त्यांनी वाशी येतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले त्याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. मीडियासमोर बोलताना गणेश नाईक साहेब म्हणाले की मला माझ्या आवडीचं वन खातं मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रा साठी मला काम करायचं आहे. त्याचबरोबर नवी मुंबई शहरातील पर्यावरण असेल, वृक्षसंपदा असेल ती टिकवण्याबरोबरच येथील नागरिकांना स्वच्छ वातावरण कसे मिळेल यासाठी संपूर्ण उपाययोजना करण्याचं त्यांनी जाहीर केलं.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे