Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

नवीन बायपास रोड वर बॅरिकेडमुळे अपघाताची भिती अनेक दिवस रस्त्याच्या मधोमध पडून आहेत.

नवीन बायपास रोड वर बॅरिकेडमुळे अपघाताची भिती अनेक दिवस रस्त्याच्या मधोमध पडून आहेत.

MB-NEWS (चांदुर रेल्वे):- चांदूर रेल्वे शहरातील मुख्य मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस विभागाचे बॅरिकेड रस्त्याच्या मधोमध पडलेले असून, त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. याकडे पोलीस विभागाने अद्याप लक्ष दिलेले नाही. चांदूर शहराच्या मध्यवस्तीतून जाणारा चौपदरी महामार्ग कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. हा चार रेल्वे मार्ग चंद्रपूर, वर्धा, हिंगणघाट, यवतमाळ आणि अमरावती या प्रमुख शहरांना जोडतो. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. या चौपदरी रस्त्यावर काही व्यक्ती महाराष्ट्र पोलिसांचे बॅरिकेड रस्त्याच्या मधोमध आणून रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांना अपघाताला आमंत्रण देण्याची शक्यता आहेत. या मार्गावरून चांदूर रेल्वे पोलीस व पोलीस ठाण्याचे कर्मचारी नेहमीच ये-जा करतात. मात्र रस्त्याच्या मधोमध पडलेल्या या बॅरिकेडकडे एकाही पोलिस कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याने नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होत आहेत. कोणत्या बॅरिकेडमुळे अनेक दिवस अपघात होऊ शकतो किंवा या मार्गावर मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे