लग्नाच्या निमंत्रासह इतर कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्या जाते सोशल मीडियावरून,जिकडे तिकडे आता सोशल मीडियाचा बोलबाला वॉट्सॲप मुळे पत्रिका वाटण्याचा त्रास कमी.
MB-NEWS नांदगाव खंडेश्वर, प्रतिनिधी (पवन ठाकरे):-
जागतिक पातळीवरील अनेक घडामोडी सहजरीत्या क्षणार्धात खेडोपाड्यापर्यंत पोहोचविण्याचे काम व्हाट्सअप,फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि मेसेंजर हे सोशल मीडिया करीत आहेत. यामुळे त्वरित संपर्क होत असल्याने जग जवळ आलेल आहे परंपरेच्या निमित्ताने का होईना एकत्र येणारी म्हणे मात्र दुरावलेली असल्याचे दिसून येत आहे. वास्तव्यापेक्षा आभासी दुनियेत ही मन रंमल्याचे दिसून येत आहे त्यामुळे संस्कार आणि परंपरा यामधील बाज हरवू लागल्याचे चिन्ह दिसून येत आहे.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे काळानुरूप राहणीमान व परंपरा आता मागे पडू लागली आहे लग्न समारंभाच्या निमंत्रण पत्रिका आता सोशल मीडियावर पाठविण्याचा ट्रेड प्रचलित झाला आहे. भरपूर लग्नपत्रिका छापून त्या पाहुण्यापर्यंत पोहोचविण्यासाठीचा अट्टाहास कमी झाला असून कार्यक्रमासाठीचा खर्च,आणि वेळ यामुळे वाचत आहे.
धुमधडाक्यात होणाऱ्या लग्न समारंभाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे लग्नाच्या निमंत्रण पत्रिका छापने आणि वाटणे हा होय आणि यासाठीच कार्यक्रम प्रमुखांना चांगलीच धावपळ करावी लागते गेल्या काही वर्षांपूर्वी लग्न पत्रिका घेऊन मुला मुलींचे आई-वडील नातेवाईकांना आणि आपल्या स्नेहीजणांना निमंत्रण पत्रिका देण्यासाठी त्यांच्या घरी जात होते आणि आस्थेने व आपुलकीने निमंत्रण पत्रिका देऊन त्याला लग्नाला यायचं बर का ? असं सांगत होते मात्र या निमंत्रण पत्रिका वाटताना बरेचदा अपघात सुद्धा होत असत आणि शुभ प्रसंगाना गालबोट लागत असत आजही ही प्रचलित पद्धत असली तरी इशाल मीडिया मुळे हा त्रासही कमी झालेला आहे तरी गतिमान झालेल्या या जगात त्याचे माध्यम मात्र नक्कीच बदललेले आहे सुविधा वाढल्याने वेळ खूप कमी झाला आहे माहिती तंत्रद्यानाच्या युगात दैनदिनीसह समारंभातील सोईसुविधा वाढल्याने नक्कीच नवनवीन यत्र सुद्धा आली असली अन माणसाची गरज कमी झाली आहे आजच्या या धकाधकीच्या युगात कुणालाही कुणासाठी थांबायला वेळ नाही.मग ती नाती असोत अथवा मैत्री. पाहुण्यामध्ये आठ दिवस चालणारे लग्न समारंभ आता पाच ते सहा तासावर आलेले आहेत मौजमजेसाठी वारेमाप खर्च होत असला तरी निर्मळ आनंद हरवलेला असल्याचे दिसून येत आहे एकूणच सगळ्या गोष्टीची तुलना वेळ,श्रम आणि पैसा याच्याशी होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर चांगलाच वाढलेला आहे आणि दिवसेदिवस या सवयी वाढत सुद्धा आहेत. लग्नसह बारशाचे आणि मयतीचे निमंत्रण सुद्धा आता व्हाट्सअपवर पाठविण्याचा ट्रेड सुरू झालेला आहे आणि याला नागरिकाकडून प्रतिसाद सुद्धा चांगल्या प्रकारे मिळत आहे. नागरिक आता सोशल मीडियाचा वापर करून सर्व प्रकारचे निमंत्रणे आणि संदेश देण्याचे काम सोशल मीडियाद्वारे अगदी चुटकी सरसी करू लागले आहे भरपूर लग्नपत्रिका छापून त्या पाहुण्यांना पाठविण्यासाठीचा अट्टाहास आता कमी होऊ लागला आहे निमंत्रणासाठी आता व्हाट्सअप सारख्या माध्यमांचा वापर होऊ लागला आहे यामुळे वेळेची आणि पैशाची बचत मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे घंटोका काम,मिंनटोमे होऊ लागले आहे.आणि नागरिकाचा त्रास यामुळे खूप कमी झाला आहे सोशल मीडियाने खूप चांगली संधी नागरिकांना उपलब्ध करून दिलेली आहे.

