Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

जलप्रेमी ऍड. राजीव अंबापुरे यांची जिल्हा समितीवर नियुक्ति

जलप्रेमी ऍड. राजीव अंबापुरे यांची जिल्हा समितीवर नियुक्ति

MB-NEWS (चांदूर रेल्वे ):-75 व्या अमृत महोत्सव निमित्त महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील 75 नद्यांची निवड करून त्या प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील तीन नद्यांची निवड झाली असून चांदुर रेल्वे तालुक्यातील खोलाड नदी, तिवसा तालुक्यातील पिंगळाई नदी व दर्यापूर तालुक्यातील चंद्रभागा नदी चा समावेश आहे.त्याकरिता जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली एक समितीचे गठन करण्यात येऊन त्यामध्ये 27 विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील ऍड राजीव अंबापुरे, गजानन काळे व अरविंद नळ कांडे यांची शासनाने अशासकीय सदस्य म्हणून निवड केली आहे। त्यांचेकडे अनुक्रमे खोलाड,पिंगळाई व चंद्रभागा नदीचे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

चला नदीला जाणू या हे अभियान महाराष्ट्र शासन व लोकसहभागातून सुरू करण्यात आले आहे।त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आकाशवाणी अमरावती ने सर्वांची मुलाखत घेतली असून ती दि.28 सोमवारी प्रसारित झाली आहे. महाराष्ट्रातील नद्या प्रदूषण मुक्त करण्याकरीता शाषन व लोकसहभागातुन हे अभियान चालणार आहे चांदूर रेल्वे तालुक्यातिल खोलाड नदीची जवाबदारी शाषणाने ऍड राजीव अंबापुरे यांची समन्वयक म्हणून निवड केलेली आहे या अभियानात जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या जिल्हा समितिमधे श्री अंबापुरे यांची निवड शाषणाने एका विशेष अध्यादेषद्वारे निवड केलि आहे तरी सर्व जनतेनी प्रदूषण मुक्त नदीच्या या अभियानाला सहकार्य करावे असे आवाहान समन्वयक यानी केले आहे

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे