वाचाः ७० वर्षांनंतर चित्ता भारतात; ‘या’ राजाने केली होती देशातल्या शेवटच्या चित्त्याची शिकार
चित्त्यांना त्यांच्या अधिवासात सोडल्यानंतर सुरुवातलीला ते थोडे विचलित झाल्याचं जाणवलं मात्र, त्यांचा व्यवहार व वागणं सकारात्मक होतं. आता या आठही चित्त्यांची नावं ठेवण्यात आलं आहे. ओबान, फ्रेडी, सावन्नाह, अशा, सिबली, सैसा आणि साशा असं त्याचं नामकरण करण्यात आलं आहे. त्यातील ‘आशा’ हे मादी चित्त्याचं नाव पंतप्रधान मोदी यांनी ठेवलं आहे. तर, इतर चित्त्यांची नाव नामीबिया येथेच ठेवण्यात आली होती.
वाचाः ना वाघांप्रमाणे डरकाळी, ना सिंहांसारखी गर्जना; चित्त्यांचा आवाज ऐकलात का? पाहा VIDEO
चित्त्यांवरून मोदींवर टीका
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी रविवारी ट्विटरवर एक पत्र शेअर करून त्यांनी सन २००९मध्ये ‘प्रोजेक्ट चित्ता’ सुरू केल्याचा दावा केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्ता भारतात आणण्यासाठी पूर्वीच्या सरकारांनी विधायक प्रयत्न केले नसल्याच्या आरोपांवर ते ‘विकृत खोटारडे’ असल्याचे म्हटले. ‘हे ते पत्र आहे ज्याद्वारे सन २००९मध्ये ‘प्रोजेक्ट चित्ता’ सुरू झाला होता. आपले पंतप्रधान विकृत खोटे बोलणारे आहेत. मी ‘भारत जोडो यात्रे’मध्ये व्यग्र असल्याने मला काल हे पत्र देता आले नाही,’ असे रमेश यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. या ट्वीटसोबत त्यांनी तत्कालीन पर्यावरण आणि वनमंत्री म्हणून सन २००९मध्ये वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे एम. के. रणजितसिंग यांना लिहिलेले पत्रही शेअर केले.
वाचाः मोदींच्या वाढदिवशी भारतात आलेले परदेशी चित्ते मध्य प्रदेशातच का राहणार? वाचा रंजक कारणं

