निलेश विश्वकर्मा डॉक्टरेट पदविणे सन्मानित
क्रीडा क्षेत्रातील समर्पण ; आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप विद्यापीठ
MB-NEWS( चांदुर रेल्वे ) :-क्रीडा क्षेत्रातील अतुल्य कामगिरी सोबतच शैक्षणिक,राष्ट्र,समाजासाठी घेत असलेल्या मेहनत आणि समर्पणाची ओळख म्हणून आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप विद्यापीठ दिल्ली तर्फे क्रीडा क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवीने जयहिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांना गौरविण्यात आले, या पदवीमुळे निलेश विश्वकर्मा आता डॉक्टर निलेश विश्वकर्मा या नावाने ओळखल्या जाणार आहे.
दि 25 दिसेम्बर रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या पदवीदान समारंभात त्यांना श्रीमती रोशनी लाल, ट्रस्टी आई आई यू,
पीयूष पंडित, फाउंडर एस बी पी व आई आई यू, श्रीमती इरमीना रेस्क्यू, रोमानिया, डॉ निधि बंसल मेम्बर कोर कमेटी यांच्या हस्ते गौरविण्यात आले, इंटरनॅशनल इंटर्नशिप युनिव्हर्सिटी “प्रेरणा देणारी, शोध लावणारी, तरुण मनांना प्रज्वलित करणारी” कामे करणाऱ्या कर्तबगार व्यक्तिमत्वाला डॉक्टरेट पदवीने सन्मानित करीत असतात,विद्यापीठाने दिलेल्या अधिकृततेनुसार, मानद मंडळाच्या शिफारशीनुसार आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप युनिव्हर्सिटीच्या सिनेटने निलेश विश्वकर्मा यांच्या मागील 20 वर्षातील कामाची दखल घेत त्यांना हा सर्वोच्च बाहुमान प्रदान केला. निलेश विश्वकर्मा यांनी जयहिंद क्रीडा मंडळाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक युवकांना राष्ट्रीय स्तरावर क्रीडा संधी उपलब्ध करून दिली आहे, त्या माध्यमातून शेकडो युवकांना रोजगार मिळाला आहे, त्यांच्या या कार्याची दखल घेत 2017 साली रशिया येथे ऑलम्पिक स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली होती, गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन त्यांच्या मंडळातर्फे आयोजित केल्या जात आहे, त्यातून हजारो युवक क्रीडा प्रकाराकडे वळत आहे, निलेश विश्वकर्मा नेहमीच युवकांसाठी आयकॉन व्यक्तिमत्व आहे , ही एक कौतुकाची बाब आहे एखाद्या नामांकित विद्यापीठातर्फे त्यांचा डॉक्टरेट पदवी प्रदान करून गौरव करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्रातील युवक कार्यकर्ते व तरुणांमध्ये नव चैतन्य जागृत होण्यास मदत होत आहे .वंचित बहुजन आघाडीच्या शिरावर मानाचा तुरा लावण्यासाठी हे त्यांचे कार्य उल्लेखनीय व गौरवशाली आहे. क्रिडाक्षेत्रातील सर्व कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप विद्यापीठ दिल्ली तर्फे त्यांना मनाची डॉक्टरेट मानद पदवीने सन्मानित करण्यात आले आहे त्यासाठी राज्यभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

