तिवस्यात युवकावर हल्ला..भाईगिरीतील युवकांचा शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न..

तिवस्यात युवकावर हल्ला..भाईगिरीतील युवकांचा शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न..

 

MB-NEWS-सुनिल घोरमाडे (तिवसा) :-शहरातील राष्ट्रीय महामार्गा लागत असलेल्या एका पान टपरी चालवणाऱ्या युवकावर भाईगिरीतून जीव घेणा हल्ला झाल्याची घटना शनिवार दि.11मार्च रोजी रात्री 10वाजता घडली,या हल्ल्यात युवक गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे..कीर्तीकुमार निरंजन दवाळे,वय 24 असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नांव आहे.

शहरातील वनविभागाच्या कार्यालयाला लागून असलेल्या फ्रेंड्स कॉर्नर या पान टपरी चालक कीर्तीकुमार दवाळे याला तू नवीन दुकान लावले आम्हांला सिगरेट,खर्रा व हफ्ता देत जा नाही तर चाकू मारू अश्या प्रकारे धमकावत युवकाच्या डोक्यावर खर्रा मळण्याच्या पाटलीने व दांड्याने मारहाण करत जीव घेणा हल्ल्या करण्यात आला,या हल्ल्यात कीर्तीकुमार दवाळे या युवकाच्या डोक्याला,हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर तिवसा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे ,या प्रकरणी तिवसा पोलीसांनी आरोपी पप्पू उर्फ पारस शंकर आव्हाड व ऋषिकेश राजनकर, रा तिवसा.या दोघांविरुद्ध 324,504,506,34भादवी कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.दोन्ही आरोपी फरार असून पोलीस आरोपींच्या मार्गावर आहे.
हफ्ता वसुलीच्या नावाने शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्नतून हा हल्ल्या झाल्याची माहिती असून या घटनेमुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे