हेही वाचा –मोठी बातमी: ज्या प्रकरणात संजय राऊत जेलमध्ये, त्याच प्रकरणी शरद पवारांची चौकशी करा, फडणवीसांना पत्र
साधारणता ३ हजार १०५ लोकसंख्येचं मोहिते वडगाव आहे. सधन गाव असणाऱ्या येथील प्रत्येकाला ताकरी योजनेमुळे पाणी आल्याने ऊसाचा पैसा चांगला येऊ लागला, यातून अनेक पालकांनी आपल्या पालांच्यासाठी इंग्रजी माध्यमाची शाळी निवडली. शिवाय विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल देऊ केले.
याचा परिणाम गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या पटसंख्येवर झाला होता. सध्याच्या घडीला जिल्हा परिषदेच्या शाळेत १३० तर माध्यमिक शाळेत ४५० मुलं शिकतात. तर जिल्हा परिषदेच्या शाळेतील रोडवलेली संख्या आणि इतर गोष्टींवर विचार करण्यासाठी गावचे सरपंच विजय मोहिते यांनी १४ ऑगस्ट रोजी महिलांची आमसभा बोलावली. ज्यामध्ये अनेक महिलांना मुलांच्या अभ्यासाचा विषय उपस्थित केला.
हेही वाचा –मोहाली MMS प्रकरण: होय, तिने व्हिडिओ बनवले; आरोपी तरुणीच्या वकिलाचा मोठा खुलासा
मुलं तासंतास मोबाईलवर चिकटून असतात, त्यामुळे अभ्यास करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे गाऱ्हाणे मांडले. त्याचबरोबर नेमकं सायंकाळच्या वेळेस घरात महिला टीव्ही लावून मालिकांच्यामध्ये गुंतून जातात, आणि या सर्वच गोष्टींचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होत असल्याची बाब समोर आली. यावर उपाय म्हणून गावातील सर्व टीव्ही आणि सगळ्यांचे मोबाईल दररोज दीड तास सायंकाळी सात ते साडे आठच्या सुमारास बंद ठेवण्याचा पर्याय समोर आला. मग तसा निर्णय ही एकमुखाने घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून करण्याचा निर्धार हे समस्त गावकऱ्यांनी केला. तर दररोज नित्यनियमाने टीव्ही आणि मोबाईल बंद करण्यासाठी गावाला आठवण करून देण्यासाठी मंदिरावर भोंगा लावण्यात आला. ज्यातून सात वाजण्याच्या आधी मोबाईल आणि टीव्ही बंद करण्याबाबतच्या सूचना देण्यात येतात.
हेही वाचा –फक्त १०-१२ बॉल्स खेळविण्यासाठी या खेळाडूला संघात घेऊ नका, गौतम गंभीर स्पष्टच बोलला
आता मुलांच्या अभ्यासासाठी दररोज सायंकाळी सात ते साडेआठपर्यंत गावातले टीव्ही आणि मोबाईल बंद राहतात. तसेच या वेळेत मुलं घराबाहेर पडणार नाहीत, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी पालकांच्या बरोबर गावातील शिक्षक अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यावेळी मध्ये एखादा मुलगा रस्त्यावर आढळून आला तर त्याला अभ्यास करण्याची आठवण देखील दिली जाते, ज्यामुळे आता सध्यातरी मोहितेंच्या वडगाव मध्ये सात ते साडेआठ या दरम्यान घराघरात मुलं अभ्यासात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय, ज्यातून मुलांना आणि पालकांनाही काही काळ मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहाता येतं.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विद्यार्थ्यांना शेतीचे धडे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार मोठा निर्णय

