आमदार यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने वंचिताची दिवाळी गोड झाली.

आमदार यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने वंचिताची दिवाळी गोड झाली.

MB NEWS(महाराष्ट्रातील बातमीपत्र)अमरावती :- दिवाळीचा सण आला। सर्वांणीच पाहिजे केला। परि पाहावा कोण राहिला। भुकेला घरी॥ त्यास आमंत्रित करावे! गोडधोड भोजन द्यावे! परस्परांनी मिळून चालवावे! वैभव सर्वांचेच लाल राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगितेतील या ओविंना प्रत्यक्ष कृतीची जोड देत आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी आपल्या कुटुंबासह काल 12 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या शुभपर्वावर शहारातील विविध भागात डेरेदाखल असलेल्या अनेक वंचित कुटुंबाना प्रत्यक्ष भेटून अन्नदान केले. यावेळी त्यांच्या सोबत महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेट्टा डीसुजा प्रामुख्याने उपस्थित होत्या.

दिवाळीच्या पावन पर्वावर सर्वत्र प्रचंड आनंद, जिकडे-तिकडे रोषणाई, खरेदीसाठी सर्वांचीच सुरु असलेली एकच लगबग असं चित्र असतं. परंतु शहरातील अनेक भाग विशेष करुन मुख्य चौकात डेरेदाखल असेलेलं अनेक कुटुंब मात्र यापासून वंचित असल्याचं चित्र असतं. राहायला धड आसरा नाही, दोनवेळच्या जेवणाची कोणतीच हमी नाही, तिथं ते दिवाळी कशी साजरी करणार असं विदारक चित्र असतं. नेमका हाचं सामाजिक दायीत्वाचा धागा पकडून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगितेत दिवाळीचा सण आला। सर्वांणीच पाहिजे केला। परि पाहावा कोण राहिला। भुकेला घरी॥

या संदेशला प्रत्यक्ष कृतीची जोड देत काल 12 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनानंतर शहारातील एस. टी बस स्टॅन्ड, राजकमल चौक, इर्विन चोक, अमरावती रेल्वे चौक व अनेक ठिकाणी आमदार यशोमती ठाकुर यांनी आपल्या कटुंबासह प्रत्यक्षभेट घेऊन अन्नदान केलं. त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे वर्षभर ऊन, वारा पाऊस याचा मारा झेलत आणि समाजातून बहिष्कृत म्हणून आपल्या कुटुंबासह राहणाऱ्या या वंचित कुटुंबाची सुद्धा दिवाळी गोड झाली.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे