महाराष्ट्रात बनणार 22 नवीन जिल्हे; नवीन जिल्ह्यांची यादी आली समोर, पहा…

महाराष्ट्रात बनणार 22 नवीन जिल्हे; नवीन जिल्ह्यांची यादी आली समोर, पहा…

भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर महाराष्ट्रात 26 जिल्हे तयार करण्यात आले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), ठाणे, कुलाबा (रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा (आताचे नाव चंद्रपूर) या जिल्ह्यांचा समावेश होता.

यानंतर मग गरजे आणि मागणीनुसार नवीन जिल्ह्यांची निर्मिती शासनाच्या माध्यमातून करण्यात आली. तब्बल दोन दशकांच्या म्हणजेच वीस वर्षांच्या काळात महाराष्ट्रात नवीन 10 जिल्हे तयार झाले आणि सध्यांतरी 22 प्रस्तावित जिल्ह्यांची मागणी आहे.

22 प्रस्तावित जिल्हे
● नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
● अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर हे तीन जिल्हे नव्याने तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
● ठाणे जिल्ह्याचे आणखी विभाजन करण्याचा प्लॅन असून मीरा-भाईंदर आणि कल्याण या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे.
● ठाणे जिल्ह्यातून तयार झालेल्या पालघर जिल्ह्याचे देखील विभाजन करण्याचा प्लॅन आहे. जिल्ह्याचे विभाजन करून जव्हार हा नवीन जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
पुणे जिल्ह्यातून शिवनेरी जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
● रायगड मधून महाड जिल्हा तयार केला जाणार आहे.
सातारा जिल्ह्यातून माणदेश जिल्हा तयार केला जाणार आहे.
रत्नागिरी मधून मानगड जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.
● बीडमधून आंबेजोगाई जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.
● लातूर मधून उदगीर जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.
नांदेड मधून किनवट जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.
जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.
● बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव जिल्हा तयार होणार आहे.
● अमरावती जिल्ह्याचे विभाजन होईल आणि अचलपूर हा नवीन जिल्हा तयार होणार आहे.
● यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद हा नवीन जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.
● भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून साकोली हा नवीन जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
● चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन प्रस्तावित असून यातून चिमूर हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
● गडचिरोली यादेखील जिल्ह्याचे विभाजन करणे प्रस्तावित असून यातून अहेरी हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे