रविराज देशमुख यांनी शेताच्या बांधावर जाऊन केला शेतकरी माऊलींचा सन्मान
मिर्चापूर येथे शेतमजुरांसोबत संवाद साधून जाणून घेतल्या समस्या
श्री समर्थ लहानूजी महाराज यांच्या जयंती निमित्त १७ वर्षांपासून सेवा देणाऱ्या वेरूळकर परिवाराचा गौरव
MB NEWS (अमरावती):- हिरवीगार दिसणारी शेती काही उगीच पिकत नाही. तर जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून, मर मर करून सर्वस्व अर्पण करते. तेव्हा कुठे हिरवेगार पीक डोलू लागते. शेतात राबणाऱ्या शेतकरी बापाचं जेवढं योगदान या कृषिप्रधान देशात आहे. तेवढंच भरीव योगदान शेतकरी स्त्री चे सुद्धा आहे. त्यामुळेच तिला शेत माउली असे सुद्धा म्हणतात. या शेत माउलींचा भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य चे प्रदेश उपाध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविराज देशमुख यांनी तिवसा तालुक्यातील मिर्चापूर येथे थेट शेताच्या बांधावर जाऊन शेत माउलींचा सन्मान केला आहे.
श्री समर्थ लहानूजी महाराज, टाकरखेडा यांच्या जयंती सोहळ्यासाठी हजारो भाविक भक्तांची मांदियाळी जमली होती. अनेक दानशूर भाविकांनी आपले दान किंवा सेवा देऊन या सोहळ्यामध्ये सहभागी झाले. परंतु तिवसा मतदार संघातील मिर्चापूर येथील गोपीभाऊ वेरूळकर हे आपली अनोखी सेवार्थ संकल्पना गेल्या १७ वर्षांपासून राबवित आहे. ती सेवा म्हणजे आपल्या शेतात पिकणारा सर्व भाजीपाला हा श्री समर्थ लहानुजी महाराज टाकरखेडा येथील जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसादासाठी ते निशुल्क देतात. आणि विशेष म्हणजे गावातील अनेक माय माऊली यां शेतामध्ये भाजीपाला काढण्याची सेवा सुद्धा नि:शुल्क देतात. अशा शेतकरी माउलींचा यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य चे प्रदेश उपाध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविराज देशमुख खणा नारळाची ओटी भरून व श्री वेरूळकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. त्याचबरोबर मोदी सरकारच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व योजना या शेताच्या बांधावरील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर महिलांच्या बचत गटासाठी असणाऱ्या विवीध योजनांचा सुद्धा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी श्री दिनेशजी वानखडे, श्री दिनेशजी मठिया यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

