Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

घरकुल योजना 2023 मधील जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे

घरकुल योजना 2023 मधील जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे

चांदुर रेल्वे (अतुल उज्जेनकर): तालुक्यातील आमला विश्वेश्वर गाव मधीलनोकरीवरअसणारे,पेन्शन धारक, पक्के मकान असलेले यांना तलाठी आणि ग्रामपंचायतीने पैसे घेऊनघरकुल योजनेचा लाभ दिला. तसेच या योजनेतील खरे लाभार्थी असणाऱ्यांना योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. याची चौकशी झाली पाहिजे अन्यथा गावातील नागरिकांनी आमरण.उपोषण करण्याचा इशारा दिला आहे सोमवार दिनांक6/5 /2024 ला गावातील नागरिक स्थानिक सहाय्यक गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तालुक्यातील आमला विश्वेश्वर गावातील घरकुल योजनेचे खरे लाभार्थी यांना घरकुल योजने पासून वंचित ठेवले व ज्यांच्याकडे पक्के मकान आहेत जे नोकरी करतात जे पेन्शन धारक आहेत अशा नागरिकांना तलाठी आणि ग्रामपंचायत यांनी पैसे घेऊन या लाभार्थ्याचे नाव यादीमध्ये समाविष्ट केले यावेळी बोगस लाभार्थ्यांचे नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले याची माहिती प्रशासनाला देण्यात आली व आमरण उपोषण करण्याकरिता गावातील नागरिक तयार आहेत निवेदन देतेवेळी रामेश्वर कनोजिया, किसनराव चापले, उत्तम श्रीखंडे, धनराज नागरिक कर, बेबीताई नागोसे, गोपाल कांबळे, शालिक नागरीकर, दादाराव शेवतकर, रामराव कैकाडी, मधुकर धोत्रे, गणेश चराडे शारदानंदर धने, गावातील नागरिक उपस्थित होते.

बॉक्समध्ये ( या संदर्भातील माहितीनुसार 2023 मध्ये गावातील 19 परिवार पाच दिवस आमरण उपोषण केले होते त्यावेळेस आमदार व गटविकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने नागरिकांनी उपोषण सोडविले होते. यावेळी अशा बोगस लाभार्थ्यांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. तरीसुद्धा प्रशासनाने चौकशी न करता त्यावरून पाच महिने उलटून गेले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून नागरिकांनी पुन्हा निवेदन दिले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे