रिलायन्स फाउंडेशन कडून शेतकऱ्यांना खरीप पिकाबद्धल मार्गदर्शन
रिलायन्स फाऊंडेशन कडून डिजिटल फार्म स्कुल च्या अंतर्गत व्हाट्स अँपच्या माध्यमातून खरीप हंगामातील पिकांचे पेरणीपूर्व नियोजन विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली, त्यात सध्या खरीप हंगामात, अमरावती जिल्यातील प्रमुख पिक म्हणून कापूस व सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, व शेतकऱ्यांना कापूस व तूर पिक बाबत पेरणी पूर्व नियोजन कसे करावे या संबंधी बरेच प्रश्न होते. त्यामुळे या प्रश्नाचे निराकरण करण्याचा उद्देशाने. रिलायंस फॉउंडेशन माहिती सेवा यांनी जवळ 70 शेतकऱ्यांसाठी कापूस व सोयाबीन पिकांचे पेरणीपूर्व व्यवस्थापन कसे करावे याबाबत कार्यक्रमाचे आयोजन केले. ऑनलाइन पद्धतीने व्हाट्स अँप च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन मनोज काळे, रिलायंस फॉउंडेशन कार्यक्रम सहाय्यक सुमित मातीकाळे यांनी केले. या वेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणून श्री. डॉ राजेंद्र जाणे यांनी शेतकऱ्यांना पेरणीपूर्व नियोजन कसे करावे यामध्ये शेती मशागत, पेरणीची पद्धत, बीज निवड, पिकावरील बीजप्रक्रिया करण्याचे महत्व या बद्दल शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे निराकरण केले. तसेच कापूस तूर पिकावरील खत व्यवस्थापन, व तूर पिकाचे उत्पादन जास्त कसे घेता येईल या बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी अमरावती जिल्ह्यातील 70 शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी मिळालेल्या माहिती चा आम्हाला निश्चित लाभ होईल असे सांगितले व शेतकऱ्यांनी व तज्ञांनी रिलायन्स फाउंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक केले.

