*महारुद्र नगर परिसर काळोखाच्या विळख्यात..*सतत आठ दिवसापासून पथदिवे बंद..जबाबदार कोण ? विज वितरण कंपनी की नगर परिषद प्रशासन..
MB NEWS प्रतिनिधी :- (अतुल उज्जैनकर)चांदूर रेल्वे :-महारुद्र नगर येथे कोणत्याही मूलभूत सुविधा नागरिकांना व्यवस्थितपणे द्यायच्याच नाहीत, असा जणू नगर परिषदेनेने निर्धारच केला आहे की काय असा सवाल येथील नागरिक स्थानिक प्रशासनाला विचारू पाहत आहे.नगरातील पथदिवे आठ दिवसापासून बंद आहेत हे पथदिवे मधेच चालू होतात वा आपोआप बंद पडतात. रस्त्यांवरील ह्या बंद पथदिव्यांमुळे महारुद्र नगरावर जणू अंधाराचे सामराज्य पसरले आहे की काय अशी अवस्था ह्या भागाची झालेली आहे . यामुळे एखादा अपघात घडल्यास ह्याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. याशिवाय नगरातील पथदिवे बंद असल्यामुळे या ठिकाणी चोरीच्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे घडल्यास यालाही जबाबदार नगरपरिषद संबंधित विभाग राहतील का ? असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित उपस्थित केला आहे… पथदिवे बंद मुळे ज्येष्ठ नागरिक , महिला व लहान मुलां मुलींना तसेच स्थानिक नागरिकांना होत आहे.. तेव्हा हे पाथादिवे पुरवर्त सुरु करावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.

