अन्न हेच पूर्ण ब्रम्ह…..!”अतुल प्र.उज्जैनकर…✍🏻

*”अन्न हेच पूर्ण ब्रम्ह…..!”अतुल प्र.उज्जैनकर…✍🏻

१६ ऑक्टोबर जागतिक ‘ अन्नदिवस’*
*’उतानाही लो थाली मे व्यर्थ न जाये नाली मे’ हल्ली हे वाक्य प्रत्येक बड्या देवस्थानात तसेच मोठ मोठया मंगल कार्यलयाच्या भिंतीवर मोठ्या अक्षरांत अंकित केलेले दिसतेय , याची गरज खऱ्या अर्थाने आजरोजी भासतेय आणि म्हणूनच जो विचारी आहे , ज्याला भविष्याचा वेध घेता येतो अशा व्यक्ती कडून अन्नाचा अपव्यव्य कुठंतरी थांबला पाहिजे ह्यासाठी लोकांमध्ये जागृती व्हावी ह्या त्यामागचा खरा उद्देश.. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे हल्ली लोक ह्या वाक्याप्रमाणे काही अंशी तरी वागायला लागली अस म्हणणे काही वावग ठरणार नाही… *पोटाला जेवढं लागत तेवढ अन्न ताटात घेऊ लागली , पण एका समस्येवर काहीतरी उपाय निघाला तर लगेच दुसरी समस्या पुढे लगेच पुढे उभी ठाकतेच अशीच एक समस्या मी हल्ली अनुभवलेली..*यावर एक विचारवीमर्श व्हावा , लोकांच्या घशी ह्या समस्येच मर्म उतरावं ह्याच अपेक्षेतून हा लेखन प्रपंच….*
*नुकतेच गणेश उत्सव , नवदुर्गा उत्सव मोठ्या उल्हासात सर्वीकडे साजरा झाले ,ह्या दोन्ही उत्सवाचा समारोपीय कार्यक्रम म्हणजेच ‘ महाप्रसाद किंवा भंडारा ,कोणतेही देवस्थान म्हणा की मंडळ म्हणा ह्या अन्नदानाच्या कर्यक्रमासाठी दान दात्याकडून मोठ्या प्रमाणात देणगी , धान्य , आदी सामग्री दान मागून मोठ्या अथक परिश्रमाने हा अन्नदानाचा सोहळा मोठ्या स्फूर्तीने साजरा करतात. मी सुद्धा शहरात चालणाऱ्या अनेक धर्मार्थ कार्यक्रमात सक्रिय सहभागी असतो म्हणून मला एक महत्वापूर्ण भेंड्सवणारी समस्या जाणवली ती म्हणजे अशी की महाप्रसादाच्या दिवशी सुरु असलेली ‘ डब्बा पद्धत ‘. ही पद्धत पूर्णतःहा चुकीची आहे अथवा कुचकामी आहे ह्या मतांचा मी नाहीच मुळी पण ‘ मुळात महाप्रसादच्या वेळी डब्बा साठी आग्रही असणारे लोकांच्या समस्या असतीलही यात दुमत नाही कारण बऱ्याच घरामध्ये वृद्ध सदस्य असतात त्या महाप्रसादच्या स्थळा पर्यंत येऊ शकत नाही अशाच प्रकारच्या इतराही त्यांच्या काही व्यक्तिक समस्या देखील असू शकतात तेव्हा त्यांनी’ डब्ब्या ‘ साठी आग्रही राहणे स्वभाविक आहे परंतु काही लोक आपलं स्टेटस म्हणा की आणखी काही स्वभावातील गुण दोष म्हणा की , पंगती मध्ये प्रसाद घेणे त्यांना थोड अवघडल्यासारखं वाटत असावं किंवा दुसरेही काही अन्य करणे असू शकतात म्हणून तिथे न खाता असे लोक’ डब्ब्या’ ची मागणी करतात. हे सर्व करत असताना घरचा कुणीतरी व्यक्ती खासकरून घरातली महिला येते आणि डब्ब्या साठी मागणी करते पण हा डब्बा घेताना मानवी स्वभावाचे काही दोष मला आढळून आले त्यावरच प्रकाश टाकणे मला गरजेचे वाटू लागले कारण त्याचे दुष्परिणाम एवढे भयंकर असू शकतात की त्याचा आपण अंदाज सुद्धा लावू शकत नाही..पाहिला आणि महत्वापूर्ण दोष असा की…..*

*१)डब्बा घेताना मानवी लालसा (Greedy) एवढी भयंकर असते की घरात एक दोन व्यक्ती जेवयला पण डब्यात मात्र ४-५ लोकां ना पुरेल एवढ्या भरपूर अन्नाची मागणी होते.*

*२) ह्या दोशामुळे माझ्यामुळे पक्तीतील लोकांना अन्न मिळेल की नाही ? याचा मुळीच विचार नसणं.*

*३) डब्बा घेताना जिथून ‘ डब्बा हा प्रसाद म्हणून घेतला जातो त्याचं लोकांशी कमी डब्यात कमी अन्न दिल म्हणून नाहक वाद घालणे, अक्षरशः इतक्या मंगलमय सोहळ्यात भांडण होने ह्यामुळे जो प्रसाद म्हणजेच अन्नात आपण डब्यात नेतोय त्या अण्णासोबत Negative Vibrations आपण सोबत नेतोय याचं साधं ज्ञान सुद्धा चांगल्या चांगल्या लोकांना नसलेलं मी अगदी जवळून बघितलंय परिणामी सोबत सोबत नेलेला पावन प्रसाद (अन्न ) आपणच दूषित करतोय याचा दोष सुद्धा आपल्यालाच लागतो हेही बऱयाच लोकांना माहित नसत्ते.*

*४) माणसाचं पोट भरल्या नंतर माणूस आपली माणुसकी विसरतो ,ज्या अन्ना साठी तो नाह्ह्क कुणाशी वाद करून मोठ्या अथक परिश्रमाने मिळवलेले अन्न खाऊन झाल्यावर उरलेलं अन्न दुसऱ्या दिवशी अक्षरशः फेकल्या जाते याचा सुद्धा दोष त्या व्यक्तीला लागतोच..*

*५)अंतिम मुद्दा. सर्वांसाठीच जीवघेणा आहे तो असा की काही लोक टिफिन सोबत न आणता पॉलीथीन मध्ये महाप्रसादाचे अन्न मागतात ,त्या पॉलीथीन मध्ये गरम गरम भाज्या व इतर पदार्थ इच्छा नसताना टाकाव्या लागतात.लोकांचं अज्ञान एवढ परकोटीच आहे की त्यांना हे माहीतच नाही की गरम गरम पातळ भाज्या पॉलीथीन मध्ये टाकल्यावर ह्या पॉलीथीन बनविताना उपयोगत आणलेले विविध केमिकल्स उष्णतेमुळे त्या मध्ये विरघळले जातात व अन्ना वाटे मानवी शरीरात.. हे सर्व केमिकल्स एवढे भयंकर असू शकतात की ह्या मुळे कॅन्सर सारखे रोग होऊ शकतात ,हल्ली अन्ननलिकेचे ,घश्याचे , आताड्यांचे ,रक्ताचे कॅन्सर पेशंट झपाट्याने घरघरात वाढायला लागले आहे. परंतु आपण ह्या गोष्टीपासून अनभीज्ञ आहोत की अस ही काही होऊ शकते..*

*म्हणून एक सुजाण नागरिक म्हणून माझी सर्व लोकांना हात जोडून नम्र विनंती आहे की. ,” डब्यातही एवढचं अन्न घ्या की घरी नेल्यावर आपण ते खाऊ शकू ” पुरूनही उरणार अन्न असेल तर ते दुसऱ्या दिवशी वापरण्यास योग्य असेल तर वापरा पण उघड्यावर फेकू नका कारण भविष्यात ‘ Wastage of Food किंवा Scarcity Of Food म्हणजेच अन्नाची कमतरता व तुडवडा व ह्या दोन्ही गोष्टी येत्या दिवसामध्ये मानवाला ग्रासून सोडल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की…..*

*@लेखक..*
*अतुल प्र.उज्जैनकर…✍🏻*

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे