चांदूर रेल्वे तालुक्यात मिशन शिष्यवृत्ती -100 ह्या उपक्रमाचा श्रीगणेशा…”तुम्ही मोठे व्हा म्हणजे देश मोठा होईल “- -गटशिक्षणाधिकारी बोडखे
चांदूर रेल्वे :-(प्रतिनिधी )अतुल उज्जैनकर..गटसाधन केंद्र पंचायत समिती चांदूर रेल्वे व श्री मन्नालाल गुप्ता विद्यालय चांदूर रेल्वे यांचे संयुक्त विद्यमाने मिशन शिष्यवृत्ती 100 ह्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
चांदूर रेल्वे तालुक्यात इयत्ता 5 व इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती तसेच एनएमएमएस परीक्षेत प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळावे म्हणून तालुकास्तरावर श्री मन्नालाल गुप्ता विद्यालय येथे निशुल्क मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले.
जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी पुढाकार घेत जिल्हा परिषद अंतर्गत प्रत्येक तालुक्यातून किमान 100 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र व्हावे याकरिता तालुकास्तरीय यंत्रणेला उद्दिष्ट दिले. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात मिशन शिष्यवृत्ती उपक्रम राबविण्यात येत आहे. नुकतेच चांदूर रेल्वे तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन संदर्भात मुख्याध्यापकांची सभा गटसाधन केंद्र येथे घेण्यात आली.
मिशन शिष्यवृत्ती 100 अंतर्गत 100 दिवसात 100 विद्यार्थी पात्र ठरावेत या संदर्भात गटशिक्षणधिकारी संदीप बोडखे यांनी नुकतेच शिष्यवृत्ती परीक्षा कार्यशाळेचा शुभारंभ केला. यावेळी तालुक्यातील विविध गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी रवींद्र दिवाण, विषयतज्ज्ञ श्रीनाथ वानखडे, किरण पाटील, किशोर पखान, प्रमोद भागवत, राम महाजन, श्रीराम जाधव, तुषार ठाकरे, सनील झोपाटे, रवी सोळंके आदींची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे यांनी शिष्यवृत्ती परीक्षा ही पुढील स्पर्धा परीक्षा ची पायाभरणी आहे. सोप्या सोप्या ट्रिक्सच्या माध्यमातून व सरावातून या परीक्षेत यश मिळविता येते. तुम्ही मोठे झाले तर देश मोठा होईल असा मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी तालुक्यातील विविध खेड्यातील पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन व्यवस्थापनकरीता गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे व श्री मन्नालाल गुप्ता विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन कडू यांचे मार्गदर्शनात विषयतज्ज्ञ सबहा शेख, एस.एस.गेडाम, एस बी चौखंडे, व्ही.जी गिरी, ए.जी देशमुख, एन.के यादव , बी.एम. अवघड व शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहे.

