Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना डॉ मनमोहन सिंग आले होते भेटीला;70 हजार कोटींची कर्जमाफी ; प्रा वीरेंद्र जगताप यांनी दिला आठवणींना उजाळा

आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना डॉ मनमोहन सिंग आले होते भेटीला;70 हजार कोटींची कर्जमाफी ; प्रा वीरेंद्र जगताप यांनी दिला आठवणींना उजाळा

MB NEWS (चांदुर रेल्वे)प्रतिनिधी :- 2006 साली प्रभाताई राव राज्याच्या काँग्रेस अध्यक्षा असताना महाराष्ट्रातील व त्यातल्या त्यात विदर्भातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या काँग्रेसचा आमदार या नात्याने आपण तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्याकडे मांडल्या होत्या त्यावरून त्यांनी धामणगाव मतदार संघातील धामणगाव येथे स्वतः भेट देऊन शेतकऱ्यांच्या विधवांचे दुःख जाणून घेतले होते आणि त्यानंतर शेतकरी पॅकेज ची घोषणा केली होती, काल डॉ मनमोहनसिंग यांचे निधन झाले त्या प्रसंगी मनमोहन सिंग यांच्या आठवणीला उजाळा देतांना माजी आमदार प्रा वीरेंद्र जगताप यांनी वरील माहिती दिली.

प्रसिद्ध अर्थतज्ञ सोबतच शेतकऱ्यांच्या गरिबीची जाण असणारा महान नेता आज आमच्यातून हरविल्याचे त्यांनी म्हटले, 2006 मध्ये माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग धामणगाव रेल्वे येथून परत गेले त्यानंतर 3 हजार 750 कोटींचे पॅकेज घोषित केले होते, घोषित झालेल्या पॅकेज मुळे धामणगाव मतदार संघाला 7 मोठे जलसिंचन प्रकल्प मिळाले त्यात सोनगाव शिवणी, रायगड प्रकल्प, चांदीनंदी प्रकल्प, टीमटाला प्रकल्प,निम्न साखळी प्रकल्प, चांदसुरा प्रकल्प, गणेशपुर प्रकल्प यांचा त्यात समावेश आहे. त्यानंतर 2 वर्षात म्हणजेच 2008 साली 70 हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी सुद्धा डॉ मनमोहन सिंग सरकारनेच शेतकऱ्यांना दिली असल्याच्या आठवणी प्रा वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केल्या.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे