रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा सोन्याची एक लाख रुपये किमतीची अंगठी दिली पोलिसांच्या ताब्यात
MB NEWS (सोलापूर) – बेशिस्त रिक्षाचालक, भाडा जास्त आकाराने रिक्षा चालक असे रिक्षाचालक आपण पाहिले असाल पण रिक्षा मध्ये प्रवासाने ठेवलेली वस्तू पोलिसांकडे जाऊन जमा केली असे रिक्षाचालक कधी पाहिलेत का?अशी काहीशी घटना सोलापूर शहरात घडली आहे. शहरातील सैफुल चौक ते माणिक चौक पर्यंत रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका महिलेने रिक्षात एक लाख रुपये किमतीचे सोन्याची अंगठी रिक्षात विसरून गेली आहे व अंगठी कोणाची आहे त्यांना परत मिळावी या भावनेने सोलापुरातील प्रामाणिक रिक्षा चालक नंदू बेनसिंग चव्हाण यांनी एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी पोलिसांच्या स्वाधीन केली आहे.
नंदू बेनसिंग चव्हाण हे नेहमी प्रमाणे आपली रिक्षा घेऊन भाडे मारण्यासाठी निघाले होते.महिला प्रवासी भाडे सैफुल चौक ते माणिक चौक पर्यंत मिळाले होते. ते प्रवासी भाडे घेऊन MH 13 CT 2384 चे रिक्षा चालक नंदू चव्हाण निघाले होते. माणिक चौकात महिला प्रवासी उतरले, काही अंतरावर गेल्यावर रिक्षा मध्ये भाडे बसवत असताना त्यांना एक पिशवी दिसली. पिशवी मध्ये पाहिले असता काही वस्तू आणि एक सोन्याची अंगठी जवळपास त्यांनी किंमत एक लाख रुपये पर्यंत आहे. सोन्याची अंगठी रिक्षाचालकाने पाहिल्यावर ज्या ठिकाणी भाडे सोडले होते तिथे जाऊन प्रवाशी महिलेचा रिक्षा चालकाने शोध घेतला परंतु ती महिला सापडली नाही. तेव्हा रिक्षा चालक नंदू चव्हाण यांनी रिक्षा मालक वकील अहमद बागवान यांना घडलेली घटना सांगितली.तेव्हा त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा दक्षिण पोलिस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती सांगितली. तेव्हा परत घटनास्थळी जाऊन त्या प्रवाशी महिलेचा शोध घेऊन सुद्धा काही माहिती मिळाली नाही. तेव्हा रिक्षा चालक नंदू चव्हाण आणि रिक्षा मालक वकील अहमद बागवान यांनी ती सोन्याची अंगठी पोलिसांच्या स्वाधीन केली.
रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा पाहून पोलिस उप आयुक्त मुख्यालय हसन गौहर यांच्या हस्ते रिक्षाचालक नंदू चव्हाण यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शहर वाहतूक शाखा दक्षिण येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रविद्रनाथ भंडारे यांच्या कडून 1 हजार रुपये रोख बक्षिस पोलीस उप आयुक्त मुख्यालय हसन गौहर यांच्या हस्ते देण्यात आले. ज्या प्रवासी महिलेची 1 लाख रुपये किमतीची सोन्याची मौल्यवान अंगठी खरेदी केलेली बिल पावती आणून आपली वस्तू घेऊन जावे असे आवाहन पोलीस उप आयुक्त मुख्यालय हसन गौहर यांनी केले आहे. तर प्रामाणिक रिक्षाचालक नंदू चव्हाण यांचा सर्वत्र कौतुक होत आहे.

