Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

“रामदास कदमांनी राज्यात कुठेही फिरावे, त्यांना..,” शिवसेनेच्या महिला नेत्यांनी दिला इशारा

एकनाथ शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का? असे म्हणत टीका केल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे समर्थक रामदास कदम यांच्यावर तुटून पडले आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांनी राज्यात कुठेही फारावे. शिवसेना त्यांना उत्तर देईल, असा थेट इशारा दिला आहे. रामदास कदम यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

रामदार कदम यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्यांचे मानसिक संतूलन ढासाळले असून त्यांनी धसका घेतला आहे. जे दुसऱ्यांना शिल्लक सेना म्हणतात ते मुळात कफल्लक लोक आहेत. त्यांच्याकडे इमानदारी शिल्लक नाही. ते मिंधे आहेत. हे शिंदे सेनेतील नव्हे तर मिंधे सेनेतील लोक आहेत, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला.

हेही वाचा >>> “काँग्रेस, शिवसेनेसोबत युती करण्यास…”, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले…

मातोश्रीने रामदास कदम आणि गद्दारांना अत्यंत प्रेमाणे सांभाळले. त्यांना मातोश्रीने कधीही उपाशीपोटी बाहेर पडू दिले नाही. मिनाताई ठाकरे यांनी काळजीने त्यांची सरबराई केली. त्यांच्याच चारित्र्यावर आता हे शिंतोडे उडवत आहेत. रामदास कदमांनी राज्यात कुठेही फिरावे. शिवसेना त्यांना उत्तर देईल,’ असा इशाराही त्यांनी रामदास कदमांना दिला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे