Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

जळका (जगताप) ते विरूळ रोडचे काम शिवसेनेने पाडले बंद.निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य कौस्तुभ खेरडे यांचे नेतृत्व…..

जळका (जगताप) ते विरूळ रोडचे काम शिवसेनेने पाडले बंद.निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य कौस्तुभ खेरडे यांचे नेतृत्व…..

MB-NEWS :-अमरावती (चांदूर रेल्वे) –: चांदूर रेल्वे तालुक्यातील जळका (जगताप) ते विरूळ (रोंघे) या रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत शिवसेनेने ग्रामपंचायत सदस्य कौस्तुभ खेरडे यांच्या नेतृत्वात काम बंद पाडले.

९ ऑक्टोंबर रोजी जळका ते विरूळ रोड चे काम खराब पद्धतीने सुरू होते. या कामावर खड्डा खोदून ८० एमएमची गिट्टी टाकली नसुन काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बाब शिवसेनेचे जळका येथील ग्रामपंचायत सदस्य कौस्तुभ खेरडे, गजानन भरडे व शिवसेना उपशाखाप्रमुख अमोल गजभे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी लगेच सदर सुरू असलेले काम बंद करायला लावले. नंतर कंत्राटदाराच्या सुपरवायजरने कामावरील सगळे साहित्य व गाड्या विरुळ येथे नेत असतांना कौस्तुभ खेरडे यांनी त्वरित विरूळ येथील सामाजिक कार्यकर्ते चिंटू रोंघे यांच्या सोबत संपर्क साधला व सदरची बाब सांगितली. त्यानंतर विरूळचे सरपंच रुपेश गुल्हाने, उपसरपंच गोपाळ मांडुळकर यांनी रोडवर येवून दुसऱ्या बाजुने काम करू दिले नाही. यावरून सदर कामावर संबंधित विभागाचे अधिकारी यांचे लक्ष नसल्याचा आरोप उपस्थितांनी केला.

अन्यथा काम होऊच देणार नाही – कौस्तुभ खेरडे                  जळका ते विरूळ रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आमच्या निदर्शनास आल्यानंतर मी व शिवसेनेच्या सहकाऱ्यांनी, गावकरी यांनी सदर काम बंद पाडले. संबंधित अधिकाऱ्यांनी या कामावर येऊन पाहणी करावी व चांगल्या दर्जाचे काम करायचे असले तरच काम सुरू करावे अन्यथा हे काम होऊ देणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य कौस्तुभ खेरडे यांनी दिला आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे