किरकोळ वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांना कारने उडवले; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

किरकोळ वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांना कारने उडवले; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

MB NEWS :- (अमरावती):- एका कुटुंबांतील सहा सदस्यांना चारचाकी वाहनाने उडवून तिघांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत तीन जण जागीच ठार झाले व तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरची कोंबडी कुत्र्याने का खाल्ली? म्हणून थेट रागाच्या भरात अंगावर कार चढवून ही हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन आरोपींला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत अनुसया अंभोरे (वय 67), शामराव अंभोरे (वय 70) आणि अनारकली गुजर (वय 43) यांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे