Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

मोझरी येथील शेतकरी युवकाची गळफास लावून आत्महत्या.

मोझरी येथील शेतकरी युवकाची गळफास लावून आत्महत्या.

तिवसा (ता.प्र)नंदकिशोर मते:-तिवसा तालुक्यातील मोझरी येथील शेत शिवारात झाडाला गळफास लावून शेतकरी युवकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.विजय आनंदराव चोपकर वय ४२वर्षे रा.मोझरी असे गळफास घेतलेल्या शेतकरी युवकाचे नाव आहे.
विजय हा काही दिवसांपूर्वी गंभीर आजारी होता.नुकतेच त्याला रुग्णालयातुन घरी आणण्यात आले होते.परंतु गेल्या काही दिवसांपासून तो अस्वस्थ रहात असल्याचे सांगण्यात येते.तसेच  मंगळवारी सकाळपासून तो घरुन बेपत्ता होता.कुटुंबियांकडुन त्याची शोधाशोध करण्यात आली.
अखेर बुधवारी सकाळी आठ वाजता लगतच्या शेतकऱ्याला शेताच्या बांधावरील झाडाला मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळून आला.तेव्हा घटनेची माहिती तिवसा पोलिसांना देण्यात आली.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी तिवसा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. पुढील तपास तिवसा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे