<p>पत्रा चाळ भ्रष्टाचार प्रकरणात शरद पवार यांचा सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी करा </p>
<p>भाजप आमदार अतुल भातखळकर यांची गृहमंत्र्यांकडे मागणी</p>
<p>मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरुआशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.</p>
Atul Bhatkhalkar : पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांचंही नाव? सहभागाची चौकशी करण्याची मागणी

