Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

Uddhav Thackeray Live : संजय राऊत मोडेन, पण वाकणार नाही या निश्चयाने लढतोय!

Uddhav Thackeray Live : संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढतोय, तलवार हातात घेऊन लढत आहेय, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठराखण केली. गोरेगावमध्ये आज शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यातून मुंबई महानगरपालिकेसाठी रणशिंग फुंकले. 

भाषणाला सुरुवात करताच उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचे सांगत इरादा स्पष्ट केला. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे म्हणाले की,  व्यासपीठावर आल्यानंतर दोन गोष्टी पाहिल्या. एक रिकामी खूर्ची आहे, मी एक खुलासा करू इच्छितो नाही, तर उद्या एक चौकट यायची संजय राऊत मिंधे गटात गेले. मिंधे सगळे तिकडे गेले आहेत, पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढतोय. आणि लढाईसाटी सोबत आहे, तलवार हाती घेऊन आघाडीवर आहे. आणि दुसरी गोष्ट पाहिली आमचे वडील आहेत का व्यासपीठावर. कारण मुलं पळवणारी टोळी ऐकलीय, पण बाप पळवणारी औलाद सगळ्या महाराष्ट्रातून फिरतेय. 

दरम्यान, शिवसेनेच्या आजच्या गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर खासदार संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची आरक्षित ठेवण्यात आली आहे. ईडीने कारवाई केलेल्या आणि सध्या तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांच्यामागे संपूर्ण पक्ष ठाम असल्याचा संदेश देण्यात आला आहे. 

दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार 

दरम्यान, शिवसेनेचा शाण असलेला दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार की नाही? यावरून बरीच चर्चा सुरु असताना दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी एल्गार केला. गेल्या महिन्याभरापासून शिवसेनेच्या अर्जावर मुंबई महापालिकेकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे बीकेसी मैदान शिंदे गटारकडून निश्चित करण्यात आल्याने उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? याबाबत राजकीय वर्तुळात औत्सुक्य होते. त्यांनी आता यावर स्पष्ट भाष्य करताना शिवतीर्थावरच होणार असल्याचे ठणकावून सांगितले. 

भाजपवरही कडाडून हल्लाबोल 

उद्धव ठाकरे यांनी भाजपचा कमळाबाई असा उल्लेख करत कडाडून हल्ला चढवला. मुंबईवर सध्या गिधाड फिरत आहेत. लचके तोडणारी औलाद फिरत असल्याचा घणाघात त्यांनी केला. अमित शहा यांनाही उद्धव ठाकरे यांनी ललकारताना तुम्ही जमीन दाखवाच आम्ही तुम्हाला अस्मान दाखवू, असे जाहीर आव्हान दिले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे