Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना 755 कोटी रुपयांची मदत..* 💥 *तुमच्या जिल्ह्याला मिळाला किती निधी जाणून घ्या..

🌨️अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना 755 कोटी रुपयांची मदत..
💥 *तुमच्या जिल्ह्याला मिळाला किती निधी जाणून घ्या..

➖️ अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.

👉 अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये बसत नसतानाही या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद, अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यातील 4 लाख 38 हजार 489 हेक्टर क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील 36 हजार 711.31हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील 74 हजार 446 हेक्टर असे एकूण 5 लाख 49 हजार 646.31 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे 755 कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आहे. या निर्णयाचा सुमारे 5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

🌨️राज्यात जून ते ऑगस्ट अतिृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी 8 सप्टेंबर 2022 रोजी सुमारे 3445.25 कोटी आणि 56.45 कोटी इतका निधी नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे. शिवाय गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीपोटी औरंगाबाद विभागास 98.58 कोटी तर नाशिक, अमरावती, पुणे यांच्या सुधारित प्रस्तावानुसार 354.07 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.

👉 *मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयाचा ‘या’ जिल्ह्यांना होणार लाभ*

▪️औरंगाबाद – 12679 हेक्टर क्षेत्र
▪️जालना- 678 हेक्टर क्षेत्र
▪️परभणी- 2545.25 हेक्टर क्षेत्र
▪️हिंगोली- 96677 हेक्टर क्षेत्र
▪️ बीड- 48.80 हेक्टर क्षेत्र
▪️ लातूर- 213251 हेक्टर क्षेत्र
▪️उस्मानाबाद- 12609.95 हेक्टर क्षेत्र
▪️ यवतमाळ- 36711.31 हेक्टर क्षेत्र
▪️सोलापूर- 74446 हेक्टर क्षेत्र

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे