Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आझाद नवदुर्गा मंडळाचा सामाजिक उपक्रमा मध्ये रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन

आझाद नवदुर्गा मंडळाचा सामाजिक उपक्रमा मध्ये रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन

 

MB-NEWS (चांदूर रेल्वे ):- शहरातील आझाद नवदुर्गा मंडळाच्या वतीने आज वाघ मंगल कार्यालयात अमरावती येथील डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयची चमू व साई पॅथालाजी लॅब च्या तर्फे रक्तदान व रक्तगट शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते परीक्षित जगताप उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष धनराज भूत, उपाध्यक्ष सनी जोशी व सदस्यांनी उपस्थित डॉ चमूचे तसेच पाहुण्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.या रक्तदान शिबिरा मध्ये 50 रक्तदात्यानी रक्तदान केले तर 70 स्त्री पुरूषांनी रक्तगट व रक्त तपासणी केली मंडळाच्या वतीने सर्व रक्तदात्यचे आभार मानले मंडळ मागील 40 वर्षापासून शहरात धार्मिक,सामाजिक कार्यात सहभाग घेत आहे तर नवरात्री उत्सवात रोज महिलेसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू कलावटे यांनी मानले शिबिराला यशस्वी करण्यासाठी मंडळाचे राजू कलावटे, पिंटू पतरिया,अतुल उज्जेनकर सागर गोटले, निलेश टाके, भरत कलावटे, राहुल यादव, ओम वानखडे, उज्वल उद्यापूरिया, आदित्य देवगिकर, सौरभ शिंगणजोडे, मंगेश कानतोडे, , निकुंज उदयपुरिया,हिराज कलावटे, सनी जोशी, रोशन शेंडे,आर्यन कालावटे ,राज,आदित्य महर्षी,रोशन लांजेवार,भूषण वाघ,शुभम इंगळे,पारस पतरिया,रुपम दुबे, राहूल कावळे , निखिल राऊत, रोहित धुबे, प्रतीक राय, पराग भेंडे, तन्मय उदयपुरिया, अतुल वैद्य, पराग वाघ, अनुज वाघ, धनंजय भूत, नानू भेंडे, तसेच इतर सर्वच कार्यकारिणी सदस्यांनी मेहनत सुद्धा या कार्यक्रम करिता घेतली.

आझाद मंडळ शहरातील धार्मिक,समाजिक कार्यात सहभाग घेतो -: हर्षल वाघ
चांदूर रेल्वे येथिल आझाद नवदुर्गा उत्सव मंडळ शहरात नेहमीच धार्मिक व सांस्कृतिक,सामाजिक क्षेत्रात सहभागी असते नवरात्री उत्सव दरम्यान आरतीला उपस्थित 5 महिलांना लकी ड्रॉ काढुन साडी चोळी उपहार दिली जाते, गरबा नृत्याचे आयोजन करण्यात येते मंडळाचे सर्वच सदस्या मोठ्या उत्साहात नऊ दिवसाचा हा उत्सव आनंदात साजरा करतात.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे