Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

केंद्र सरकारचा मोठा निर्णय,आता ‘अशा’ वाहनचालकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही

केंद्र सरकारचा मोठा निर्णय,आता ‘अशा’ वाहनचालकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही

MB-NEWS (दिल्ली):- काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने हवेचे प्रदूषण करणाऱ्या गाड्यांची संख्या कमी करण्यासाठी ‘स्क्रॅप पाॅलिसी’ आणली होती._
त्यानंतर आता केंद्र सरकारने गाडीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘पीयूसी’ प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वाहनचालकाकडे ‘पीयूसी’ प्रमाणपत्र नसल्यास पेट्रोल – डिझेल दिले जाणार नाही.
पेट्रोलपंपावर इंधन भरताना आता ‘पीयूसी’ प्रमाणपत्र दाखवावं लागणार आहे, अन्यथा वाहनचालकांना पेट्रोल डिझेल दिले जाणार नाही. येत्या 25 ऑक्टोबरपासून हा नवा नियम लागू केला जाणार आहे.असे केंद्र सरकारने सांगितले आहे.
तसेच, वाहनांचे पीयूसी प्रमाणपत्र कालबाह्य झाल्याचे आढळल्यास वाहनचालकांना ते पंपावरच दिले जाणार आहे. देशातील सर्व पेट्रोलपंपांवर ही व्यवस्था केली जाणार आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार_ज्या वाहन-धारकाकांकडे ‘पीयूसी’ प्रमाणपत्र नसेल अशा वाहनचालकांना 10 हजार रुपयांपर्यंत दंडही केला जाऊ शकतो असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे