तळेगाव ठाकुर येथील आदिशक्ती मॉ रेणुकामातेचे जागृत आणि पुरातन मंदिर नवरात्रोत्सवात सजले….

तळेगाव ठाकुर येथील आदिशक्ती मॉ रेणुकामातेचे जागृत आणि पुरातन मंदिर नवरात्रोत्सवात सजले….

MB-NEWS (आशिष देशमुख, प्रतिनिधी):-अमरावती नागपुर महामार्गांवपासुन आत आणि राष्ट्र संत तुकडोजी महाराजाच्या महासमधीपासुन पाच किमी अंतरावर तळेगाव ठाकुर येथील आदिशक्ती मॉ रेणुकामातेचे जागृत आणि पुरातन मंदिर नवरात्रोत्सवात सजले आहे भाविक मोठया संख्येने येथे गदी करीत आहेत .रेणुकादेवी मंदिराचा परिसर प्रथमदर्शनी दिसणारे विठ्ठल.रुक्मिणीचे पूर्वाभिमूख मंदिर राम मंदिर उंच टेकडीवरील दत्त मंदिर शिवाचे पुरातन हरिहर मंदिर. जगदीश महाराजाचे मंदिर आणि पुरातन आखाडा या जोडगोळीत अत्यंत पवित्र आणि शालीन भासते .पिंगळाई नदीच्या काठावरील रेणुकामातेच्या मंदिराच्या आवारात सुर्याची किरणे दिवसाच्या प्रारंभीच पडतात.सातशे आठशे वर्ष पुरातन हे मंदिर आहे नवरात्राच्या दिवसांमध्ये विविध जप .गोधळ. सप्तशती पाठ .होमहवन .भजन किर्तन महापुजा आरती प्रार्थना अशी भक्तीची सर्व साधने होत आहेत अंबाडीची भाजी आणि भाकरी असा वैशिष्टयपूर्व महाप्रसाद नवरात्राच्या समाप्तीला राहणार आहे अशोक भारती महाराज मंदिराचे व्यवस्थापन हाताळत आहेत.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे