विद्यार्थ्यांना ‘इतके’ दिवस राहणार दिवाळीच्या सुट्ट्या…आहे. शिक्षण विभागाने शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर केल्यामुळे मुलांना दिवाळीत धमाल-मस्ती करता येणार आहे..
MB-NEWS (मुंबई ):-शालेय शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील प्राथमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान, तर माध्यमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
जाणून घ्या सुट्ट्यांचे सविस्तर वेळापत्रक… विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र 20 ऑक्टोबरला संपेल, तर दिवाळीला सुरुवात 21 ऑक्टोबर वसुबारसेपासून होणार आहे. त्यानुसार, प्राथमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान सुट्ट्या आहेत. तसेच, 6 नोव्हेंबरला रविवार असल्याने, 7 नोव्हेंबरपासून शाळा नियमित सुरु होतील.
माध्यमिक शाळांना 21 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरदरम्यान सुट्ट्या राहणार असून 13 नोव्हेंबरला रविवार असल्याने 14 नोव्हेंबरपासून शाळा सुरु होतील. या वेळापत्रकानुसार माध्यमिक शाळांना पाच-सहा दिवस सुट्ट्या वाढण्याची शक्यताआहे…

