Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

 काही दिवसांनी जेष्ठनागरीक यांना बँक आपल्या दारीं ही योजना , बँक सुरु करणार आहे घरबसल्या मिळणार बँकिंग सेवा ज्येष्ठ नागरिकांसाठी 

काही दिवसांनी जेष्ठनागरीक यांना बँक आपल्या दारीं ही योजना , बँक सुरु करणार आहे घरबसल्या मिळणार बँकिंग सेवा ज्येष्ठ नागरिकांसाठी….

MB-NEWS (दिल्ली):-देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे – केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या ‘बेसिक बँकिंग सेवा’ देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार देशातील 70 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठांसाठी केंद्र सरकारतर्फे ‘बँक आपल्या दारी’ ही योजना राबवली जाणार आहे.आरबीआय ने याआधी ‘बँक आपल्या दारी’ ही सेवा सुरु करण्यासाठी 31 डिसेंबर 2017 व 30 एप्रिल 2020 पर्यंतची डेडलाइन दिली होती, परंतु आतापर्यंत ही सेवा देशात सुरू झालेली नाही.आता अर्थ मंत्रालयाअंतर्गत येणारा वित्त सेवा विभाग अर्थातच ‘डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस’मार्फत बँकर्ससाठी नवा नियम आणण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.  यामध्ये फक्त ज्येष्ठांसाठी नव्हे, तर दिव्यांगांसाठीही ‘बँक आपल्या दारी’ ही योजना राबवली जाईल. त्यासाठी अत्यंत कमी शुल्क आकारलं जाईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ‘युनिव्हर्सल नंबर’ लाँच केला जाणार आहे.यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना खातं उघडणं, फिक्स डिपॉझिट, पेन्शन सेवा, विमा, गुंतवणूक, कर्जपुरवठा अशा सुविधा दिल्या जाणार आहेत.

तसेच ज्या बँक शाखांची निवड केली जाईल, त्यांना सेवा देणं बंधनकारक राहिल. त्यानंतर दुसऱ्या शाखाही या सेवेशी जोडल्या जातील. याव्यतिरिक्त या योजनेअंतर्गत बँकिंग सेवांसोबत विमा आणि चलन सेवाही दिली जाणार आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे