Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यानेच घातला शिक्षिकेलाच हजारोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यानेच घातला शिक्षिकेलाच हजारोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

MB-NEWS(औरंगाबाद):- औरंगाबाद शहरातील नामवंत शाळेत कार्यरत असलेल्या 55 वर्षीय शिक्षिकेला त्यांच्याच माझी विद्यार्थ्याने आपण कस्टम विभागात नोकरीला असल्याची थाप मारून तुम्हाला स्वस्तात वस्तू देतो, असे म्हणत तब्बल 40 हजार 800 रुपयांना आपल्या शिक्षिकेला गंडा घातला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात शनिवारी शिक्षिकेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज सयाजी साळवे असे या माजी विद्यार्थ्याचे नाव आहे.
शिक्षिकेने त्याला ॲपलचा मोबाइल व लॅपटॉपविषयी विचारणा करून ऑर्डर दिली. त्यासाठी पृथ्वीराजने 40 हजार 800 रुपये घेतले. त्यानंतर माझ्या पत्नीची तब्येत बरी नाही, असे म्हणून 50 हजार मागितले. डिस्काउंट जरा कमी झाला म्हणून 11 हजार अजून पाठवा, अशी विविध कारणे सांगून त्याने पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिक्षिकेला संशय आला. काही दिवसांनी पृथ्वीराज मोबाइल बंद करून फरार झाला. यामुळे आपली फसवणूक झाली आहे, असे शिक्षिकेच्या लक्षात आले. यानंतर शिक्षिकेने जवाहरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. यानंतर महिला शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्दा दाखल करण्यात आला आहे. जवाहरनगर पोलीस ठाणे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे