Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्तराष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत एकदिवसीय बदल….

गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्तराष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत एकदिवसीय बदल….

अमरावती  : – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी महोत्सव शुक्रवार दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी मोझरी येथील गुरुदेव नगर येथे साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे मौन श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे एक ते दीड लाख भक्तगण समाधीस्थळी जमतात. या कार्यक्रमादरम्यान होणारी गर्दी पाहता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतुक व्यवस्थेत एकदिवसीय बदल करण्यात आला आहे. यानुसार अमरावतीकडून तिवसा तालुक्यातील मोझरी – गुरुदेव नगर मार्गे नागपूरकडे जाणारी वाहतूक (एसटी बसेस, रुग्णवाहिका व अग्निशमन वाहन वगळून) नांदगाव पेठ पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून मोर्शीमार्गे नागपूरकडे वळविण्यात येत आहे.

नागपूरकडून अमरावतीकडे येणारी वाहतूक (एसटी बसेस, रुग्णवाहिका व अग्निशमन वाहन वगळून) तिवसा शहरातील पंचवटी चौकातून कुऱ्हा मार्गे अमरावतीकडे वळविण्यात येत आहे. ही वाहतूक व्यवस्था दि. 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वरील मार्गाने वळविण्यात येत आहे. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द मोटार वाहन कायदा व मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाअधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे