Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

खाटीक समाज परिवर्तन संघटनेचा तालुकास्तरीय समाज मेळावा संप्पन्न  झाला….

खाटीक समाज परिवर्तन संघटनेचा तालुकास्तरीय समाज मेळावा संप्पन्न  झाला….

MB-NEWS(अचलपूर)प्रतिनिधी :-खाटीक समाज परिवर्तन संघटनेतर्फे धामणगाव गढी ता.अचलपूर येथे दिनांक 15-10-2022 रोजी तालुकास्तरीय समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी श्री संजयराव कुर्हेकर तर प्रमुख पाहुणे श्री नंदू भाऊ हरणे अध्यक्ष खाटीक समाज परिवर्तन संघटना अमरावती तसेच गणेशराव कुर्हेकर,मनोज मंडवे,दिलीप माहुरे,राजेश पारडे,अरुण पारडे, कीर्ती काळे,दुर्गाताई कुर्हेकर होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रफुल कुर्हेकर यांनी केले तर आयोजंकातर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या मेळाव्यामध्ये दिनांक 11 मे 2023 रोजी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य “सामूहिक विवाह सोहळा”या विषयावर चर्चा करण्यात आली असून जास्तीत जास्त वधू-वर जोडप्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन श्री नंदू भाऊ हरणे यांनी केले,तर संघटना वाढीसाठी तालुकास्तरावर समाज मेळाव्याचे आयोजन करून जास्तीत जास्त बांधवांनी आजीवन सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कठाळे यांनी आपल्या भाषणात सांगितले,तसेच सचिव मोहन नेहर,उत्तमराव बावणे,राजेश पारडे, अरुण पारवे,माणिकराव नेहर यांनी समाज प्रबोधन पर भाषण देऊन आपले विचार व्यक्त केले,तसेच संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख सतीश माहुरे यांनी उपस्थित मान्यवर व समाज बंधू आणि भगिनींचे आभार व्यक्त केले.या मेळाव्यात तालुक्यातील अनेक समाज बांधवांनी संघटनेचे आजीवन सदस्यत्व स्वीकारून संघटनेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.या मेळाव्याच्या आयोजनासाठी बाळासाहेब कुर्हेकर,रामदास माहुरे,अशोक कुर्हेकर,साहेबराव कुर्हेकर,अजाबराव कुर्हेकर,अक्षय खराटे,गोलू कुर्हेकर,मधुकरराव कुर्हेकर,पवन सदाफळे,श्रीकृष्ण कंटाळे,रामेश्वर माहुरकर,सुभाष लोणारे,मनोहर पारवे,घनाडे,तानाजी नाथ आश्रम,तसेच तालुक्यातील सर्व समाज बंधू आणि भगिनींचे विशेष सहकार्य लाभले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे